मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan Crime News:कल्याणमध्ये भाजप व शिंदे गटात राडा! भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा महेश गायकवाडवर पोलिस ठण्यातच गोळीबार

Kalyan Crime News:कल्याणमध्ये भाजप व शिंदे गटात राडा! भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा महेश गायकवाडवर पोलिस ठण्यातच गोळीबार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 03, 2024 12:35 PM IST

Kalyan Crime News : कल्याणमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यांनी थेट पोलिस ठण्यातच एकमेकांवर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या.

गणपत गायकवाड-महेश गायकवाड
गणपत गायकवाड-महेश गायकवाड

Kalyan Crime News : कल्याणमध्ये मध्यरात्री मोठा राडा झाला. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये हा वाद झाला असून थेट पोलिस ठण्यातच त्यांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे नगरसेवक व शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश जगताप यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी चार गोळ्या झाडल्याची माहिती असून यात महेश गायकवाड जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे. गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

Raj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर...

कल्याण परिसरातील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद जुना आहे. त्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वैर देखील सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील हा वाद अधून मधून उफाळून येत असतो. शुक्रवारी देखील दोन्ही गटात असाच वाद झाला. हा वाद थेट पोलिस ठाण्यात गेला. पोलिस ठाण्यात हा वाद मिटवण्यासाठी बैठक सुरू होती. यावेळी आमदार गणपत गायकवाड व शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख व नगरसेवक महेश गायकवाड उपस्थित होते. शांततेची चर्चा सुरू असतांना दोघांमध्ये वाद झाले. हा वाद वाढून टोकाला गेल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. महेश गायकवाड यांच्या हाताला जखम झाली असून दवाखान्याबाहेर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

Land Dispute Murder: जमिनीच्या वादातून गेल्या ५ वर्षात ३ हजार २४७ जणांची हत्या

दरम्यान, हा वाद जमिनीच्या व्यवहारावरून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ५० गुंठे जमिनीचा व्यवहार होत नसल्याने त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. दरम्यान, हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले असता गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

आत्म संरक्षणासाठी मी गोळीबार केला : गणपत गायकवाड

जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. गणपत गायकवाड यांनी एका वृत्त वाहिणीशी बोलतांना म्हणाले, माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्म संरक्षणासाठी मी गोळीबार केला, मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही, असेही ते उर्मट पणे म्हणाले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून गुंडाराज येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली. त्याचवेळी माझ्यावर होणारा अन्याय मी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितला होता. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही, असेही ते म्हणाले.

ठाण्याचे सहायक उपायुक्त दत्ता शिंदे म्हणाले, पोलिस ठाण्यात गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड हे पोलिस ठाण्यात आले होते. त्यांचा ५० गुंठयाच्या जमिनीवरून वाद होता. यावेळी बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव होता. यावेळी ठाण्याचे पोलिस निरीक्षक हे जमावाला शांत करण्यासाठी बाहेर आले. दरम्यान, ठाण्यात आत असताना गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना आणि तिघांना अटक करण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांनी आत्मरक्षणासाठी हल्ला केला असे म्हटले. मात्र, असे काही झाले नाही. सर्व जण असतांना, शांत बसले होते. महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी हे ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहत असतांना आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. तब्बल १० गोळ्या त्यांनी झाडल्या. यातील सहा गोळ्या या महेश गायकवाड यांना लागल्या. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ज्यूपिटर दवाखान्यात उपचार करण्यात आले असून सर्व गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे.

WhatsApp channel