Kalicharan maharaj big statement : जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलांचा वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केलं आहे. नाशिकमधील भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश मंदिर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar Jayanti 2024) यांच्या जयंती निमित्त कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात कालिचरण महाराजांनी केलेल्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
कालिचरण महाराज म्हणाले की, अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे?ईश्वराबाबतही धर्माच्या अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. कोट्यवधीवेळा संभोग केल्यावर जो आनंद मिळतो, अगदी तसाच किंवा त्यापेक्षा जास्त आनंद अध्यात्मापासून मिळतो.
तसेच टार्गेट पूर्ण करून देणार म्हणजे धर्म. त्यामुळे जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलाचा देखील वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही”,असं कालीचरण महाराज म्हणाले आहेत.
कालीचरण महाराज म्हणाले की, सध्याची परिस्थिती कशी आहे. पूर्वी अशी परिस्थिती होती का. माणुसकी तर धर्म शिकवणार आहेच. मात्र ज्यामध्ये धर्म नाही तो ढोर आहे. तसेच खाणे, झोपणे, सेक्स करणे, पिणे हे सर्व लक्षणे तर पशूंमध्ये देखील असतात. धर्म महत्वाचा आहे. त्यामुळे भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे का? लव जिहाद आणि लॅन्ड जिहाद संपला पाहिजे का? यावर कठोर कायदा झाला पाहिजे का? असं वक्तव्य कालीचरण यांनी केलं.
आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाचे धर्माची व्याख्या वेगळी आहे. प्रत्येकानं ईश्वराकडं सर्वोत्तम वस्तू मागितली पाहिजे. सगळ्या दुःखांचा कायमस्वरुपी नाश होणार आहे. आपण शरीर नव्हे तर आत्मा आहे. असा आनंद पाहिजे की, ज्याने सर्व दुःख संपले पाहिजे.
संबंधित बातम्या