Sangli Crime news : सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून एका चांगल्या कबडीपटू तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सांगलीतील जामवाडी मधील मरगुबाई मंदिराजवळ घडली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं तपासात पुढं आलंन आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.
अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २२, रा. जामवाडी,सांगली) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनिकेत हा एक कबड्डीपटू होता. तसेच तो एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून देखील काम करत होता. तो त्याच्या घराजवळील जामवाडी येथील सार्वजनिक मंडळातही सक्रिय होता.
अनिकेतचा काही महिन्यापूर्वी हनुमान जयंतीच्या दिवशी काही मुलांसोबत वाद हाल होता. या वादातून त्याने एका मुलाला कानशिलात मारली होती. याचा राग या मुलांना होता. मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अनिकेत घरातून जीमला जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर चालत मरगुबाई मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेले चार ते पाच मुले त्याच्याजवळ आली. त्यांनी त्याला हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या वादावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आरोपींनी त्यांच्या सोबत आणलेल्या कोयत्यांनी त्याच्यावर जोरदार वार करण्यास सुरुवात केली. यातील एक घाव त्याच्या डोक्यात तर काही घाव हे पाठीत बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींni पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या साठी पोलिस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी श्वानपथकाद्वारे आरोपीचा माग काढला. त्यांना कर्नाळ रस्त्यावरुण अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अनिकेत हा चांगला कबड्डीपटू होता. त्यांच्या या हत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.