Mumbai Local Mega block on Sunday : मुंबईत लोकलसेवा ही वाहतुकीचं प्रमुख साधन आहे. लोकलने रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. मात्र, लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आल्याने मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. जर सुट्टीनिमित्त रविवारी प्रवासाचे नियोजन केले असेल तर मुंबईकरांना लोकलचे वेळापत्रक तपासूनच रविवारी घरातून बाहेर पडावे लागणार आहे.
रविवारी मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रविवारी रेल्वेने पश्चिम, हार्बर, व मध्य मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर५ तासांचा तर मध्य रेल्वे मार्गावर इंजिनिअरिंग व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विद्याविहार व ठाणे स्थानकांदरम्यान घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली-गोरेगावदरम्यान ५ तासांचा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत हा ब्लॉक राहणार असून या कालावधीत स्लो ट्रॅकवरच्या ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत. या गाड्या फास्ट ट्रॅकवरूनच चालवल्या जाणार आहे. या ब्लॉक काळात ट्रॅक, सिग्नल व ओव्हरहेड उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार व ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सकाळी ८ ते दुपारी १२.३० दरम्यान कायम राहणार आहे. त्यामुळे एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर ६ व्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील
या गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
- गाडी क्रमांक ११०१० पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
- गाडी क्रमांक १२१२४ पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
- गाडी क्रमांक १३२०१ पाटणा-एलटीटी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक १७२२१ काकीनाडा-एलटीटी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक १२१२६ पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
- गाडी क्रमांक १२१४० नागपूर-सीएसएमटी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक २२२२६ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर ठाणे येथे ५ व्या मार्गावर या गाड्या वळवण्यात येतील. या एक्स्प्रेस ट्रेन्सला १० ते १५ मिनिटं उशीर होणार आहे.
- गाडी क्रमांक ११०५५ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस
- गाडी क्रमांक ११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक १६३५४ एलटीटी तिरुवनथपुरम नेत्रावती एक्सप्रेस
पनवेल व वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.५ ते दुपारी ०४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
हार्बर लाईन मार्गावर सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या या सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर ट्रान्स हार्बर लाइन मार्गावर सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या व पनवेलकडे जाणाऱ्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या या सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द करण्यात आलीय आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल सुरू ठेवल्या जाणार आहेत. तर ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा ही ब्लॉक काळात सुरू राहणार आहे.
संबंधित बातम्या