मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Judiciary : न्यायव्यवस्थेने आणखी एखाद्या महामारीची वाट बघू नये; सरन्यायाधीश चंद्रचूड असं का म्हणाले?

Judiciary : न्यायव्यवस्थेने आणखी एखाद्या महामारीची वाट बघू नये; सरन्यायाधीश चंद्रचूड असं का म्हणाले?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 10, 2023 10:34 PM IST

CJI DY Chandrachud : नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायव्यस्थेला सामान्य लोकांपर्यंत पोहचवलं जात असल्याबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

CJI DY Chandrachud On Judiciary In India
CJI DY Chandrachud On Judiciary In India (HT)

CJI DY Chandrachud On Judiciary In India : भारतातील न्यायव्यस्थेने कोरोना महामारीसारख्या आणखी एखाद्या महामारीची वाट पाहू नये. नव्या गोष्टींकडे आणि नव्या तंत्रज्ञानाकडे न्यायव्यवस्थेला लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन सुनावणी घेणं हे उत्तम उदाहरण आहे, असं म्हणत सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी न्यायव्यस्थेत मोठ्या बदलांचं संकेत दिले आहेत. कोरोना महामारीच्या काळात न्यायव्यस्थेनं तंत्रज्ञानाकडे लक्ष दिलं, परंतु आता आपल्याला आणखी एखाद्या महामारीची वाट न पाहता त्याच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील शांघाई कोऑपरेशन संघटनेच्या कार्यक्रमात जगभरातील न्यायाधीशांच्या बैठकीत सरन्यायाधीश बोलत होते. यावेळी भारताकडून सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती संजय कौल हे बैठकीत उपस्थित होते. यावेळी बोलताना सरन्यायाधीश यांनी भारतीय न्यायव्यवस्थेत कशा प्रकारे नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, हे सांगितलं. याशिवाय कोर्टातील कामकाज आणि त्यातील सुनावण्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं वक्तव्य सरन्यायाधीशांनी केलं आहे. त्यामुळं आगामी काळात न्यायव्यवस्थेत मोठे बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

|#+|

आता सुनावणी ऐकण्यासाठी किंवा त्यात सहभागी होण्यासाठी कुणाला कोर्टात येण्याची गरज पडत नाही. देशातील कोणत्याही भागात बसून वकिलांना ऑनलाईन युक्तिवाद करता येतो आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या सुनावण्यांचं लाईव्ह प्रक्षेपण देखील वेबसाईटवर सुरू करण्यात आलं आहे. सुनावणीच्या ट्रांसक्रिप्शन्ससाठी एआय या सॉफ्टवेयरचा वापर केला जात असून त्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या निकालांना भारतीय भाषांमध्ये अनुवादित केलं जाणं शक्य होत आहे. या सर्व गोष्टींमुळं न्यायव्यवस्थेतील कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचंही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point