मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात 'निर्भय बनो'वरून राडा; भाजप कार्यकर्त्यांनी निखील वागळेंची गाडी चारवेळा फोडली, खंडोजी बाबा चौकात हल्ला

पुण्यात 'निर्भय बनो'वरून राडा; भाजप कार्यकर्त्यांनी निखील वागळेंची गाडी चारवेळा फोडली, खंडोजी बाबा चौकात हल्ला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 09, 2024 09:09 PM IST

Nikhil Wagle Car Vandalized in pune : निर्भय बनो कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या पत्रकार निखील वागळे यांच्या कारवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Nikhil wagle car vandalized
Nikhil wagle car vandalized

पुण्यात 'निर्भय बनो' च्या कार्यक्रमावरून जोरदार राडा झाला आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पोलीस बंदोबंदात जात असतानाही वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर शाईफेक व अंडीफेकही करण्यात आली. डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात ही घटना घडली.

भाजपकडून निर्भय बनो कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही निखिल वागळे कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी पुरेपूर सुरक्षा देण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

भाजपकडून विरोध केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वागळे यांचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा घेतला. वागळे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात काही महिला व तरुणीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात वागळे यांच्या अंगावरही शाई पडली. त्यांची गाडी चारी बाजुंनी फोडली गेली. महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी आपल्यावरही हल्ला केल्याचे तसेच कपडे फाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वागळे याच्या गाडीवर वीटाही फेकून मारल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे निर्भय बनो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या आधी या कार्यक्रमात भाषण करणाऱ्या पत्रकार निखील वागळे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपने कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी घेतली होती. खंडोजी बाबा चौकात महायुती व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, संजय मोरे या महाविकास आघाडीच्या नेतेही कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दुसरीकडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून कार्यक्रमाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

WhatsApp channel