ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ जाहीर-journalist dinu randive memorial award to anant bagaitkar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ जाहीर

HT Marathi Desk HT Marathi
Jun 08, 2022 09:03 PM IST

जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना यंदाचा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक’ जाहीर करण्यात आला आहे.

<p>अनंत बागाईतकर यांना दिनू रणदिवे पुरस्कार जाहीर</p>
<p>अनंत बागाईतकर यांना दिनू रणदिवे पुरस्कार जाहीर</p>

ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना यंदाचा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक’ जाहीर करण्यात आला आहे. जेष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बागाईतकर यांची निवड जाहीर केली. येत्या १६ जून रोजी मुंबईत एका कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. (Dinu Randive memorial award to Senior Journalist Anant Bagaitkar)

समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या लेखणीद्वारे मांडणारे ध्येयवादी पत्रकार दिनू रणदिवे यांचे १६ जून २०२० रोजी निधन झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते एक आघाडीचे शिलेदार होते. रणदिवे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत रणदिवे यांच्या अनेकविध कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना अभिप्रेत अशी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला दरवर्षी ' पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक' देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार यंदा हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख २५००० रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

२०२०-२१ या वर्षाचे पहिले 'पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक' जेष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांना जाहीर करण्यात आले होते.

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पुरस्कार निवड समितीमध्ये गुरबीर सिंह, नरेंद्र वाबळे, हारीस शेख व पुष्पा महाडिक यांचा समावेश आहे. पारितोषिक वितरण समारंभ दिनू रणदिवे यांच्या गुरुवारी १६ जून २०२२ या स्मृतिदिनी मुंबईत होईल.

विभाग