छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कसा? इंजिनीअर आणि नौदल अधिकारी मिळून कारणे शोधणार-joint technical committee of navy and state government to investigate reasons behind collapse of shivaji maharajs statue ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कसा? इंजिनीअर आणि नौदल अधिकारी मिळून कारणे शोधणार

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कसा? इंजिनीअर आणि नौदल अधिकारी मिळून कारणे शोधणार

Aug 29, 2024 10:23 AM IST

Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण येथील राजकोट तटावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारने नौदल आणि तज्ञ अभियंत्यांची समिती स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे.

shivaji maharaj statue : पुतळा पडला कसा? इंजिनीअर आणि नौदल अधिकारी मिळून कारणे शोधणार
shivaji maharaj statue : पुतळा पडला कसा? इंजिनीअर आणि नौदल अधिकारी मिळून कारणे शोधणार

Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : भारतीय नौदलानिमित्त सिंधुदुर्ग येथील मालवण येथे उभारण्यात आलेला किल्ला सोमवारी कोसळला. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले होते. या घटनेमुळे विरोधकांनी सरकारवर मोठी टीका सुरू केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  ही घटना कशी घडली ? त्याची कारणे काय ? हे शोधण्यासाठी नौदलाचे अधिकारी आणि तज्ञ इंजिनियर यांची समिती स्थापन करण्यात आली, असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत दिली. 

नौदल-राज्य सरकारची संयुक्त तांत्रिक समिती

मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्य सरकारवर मोठी टीका केली जात आहे. या प्रकरणी विरोधकांनी सरकारव मोती टीका केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ही समिती या घटनेमागे कोण जबाबदार आहे याची जबाबदारी निश्चित करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवरायांच्या कर्तुत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राजकोट येथे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती नेमली जाईल. या बाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.

वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

झालेली घटना दुर्दैवी; मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.