Indian railway jobs : दहावी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी! ३ हजारहून अधिक जागा भरल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indian railway jobs : दहावी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी! ३ हजारहून अधिक जागा भरल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर

Indian railway jobs : दहावी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी! ३ हजारहून अधिक जागा भरल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर

Updated Dec 18, 2023 12:29 PM IST

Railway jobs news : दहावी उत्तीर्ण असलेल्या आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत बंपर भरती निघाली आहे. रेल्वे विविध पदांसाठी तब्बल ३ हजार जागा भरणार आहे. या साठी नॉटिफिकेश निघाले असून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

indian railway jobs notification 2023
indian railway jobs notification 2023 (MINT_PRINT)

indian railway jobs notification 2023 : गेल्या काही महिन्यांपासून देशातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती केली जात आहे. राज्य तसेच केंद्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी परिक्षेची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता भारतीय रेल्वेतही मोठी पदभरती निघाली आहे. रेल्वेत करियर करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. भारतीय रेल्वेने विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल ३ हजार जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. जर तुम्ही १० वी पास असाल आणि आयटीआयचे प्रशिक्षण (ITI) घेऊन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना ही सुवर्णसंधी आहे. यासाठी पात्र असणाऱ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे भरतीसाठी लागणारी पात्रता, निवड प्रक्रिया आणि अन्य तपशील जाणून घेवूयात.

Mumbai news : मुंबईकरांनो, कबुतरांना दाणे टाकणे पडेल महागात; बीएमसी घेणार इतका दंड

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाने ३ हजारहून अधिक रिक्त पदांसाठी नोकरी भरती सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थींसाठी ३ हजार १५ जागा रिक्त आहेत. आयटीआय केल्यानंतरही नोकरीची संधी मिळत नसलेल्या आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

या पदासाठी अर्ज करण्याचे शुल्क हे १३६ रुपये आहे. यातील १०० रुपये हे अर्ज शुल्क तर ३६ रुपये हे प्रक्रिया शुल्क म्हणून आकारण्यात येणार आहे. एससी, एसटी, तसेच महिला उमेदवारांना फक्त ३६ रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. तसेच अर्जाचे शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. १५ डिसेंबर पासून अप्रेंटिसशिप भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १४ जानेवारी आहे.

Sarpanch Strike : गावगाडा ठप्प होणार! गाव कारभाऱ्यांचा आजपासून तीन दिवस संप; कामे रखडणार

ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी वयोमर्यादा ही किमान १५ वर्ष राहणार आहे. तर कमाल वयोमार्यादा ही २४ वर्ष आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादा सवलत लागू राहणार आहे. या साठी उमेदवाराने १०वी उत्तीर्ण केलेली असावी आणि ट्रेडमध्ये NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले अनिवार्य राहणार आहे. यात आयटीआय केलेले असने ही महत्वाची अट आहे.

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी निवड ही गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. दहावी परीक्षेतील सरासरी गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या निवडी केल्या जाणार आहेत.

इच्छुकांना पश्चिम रेल्वेचे संकेतस्थळ https://www.wcr.indianrailways.gov.in/ यावर लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या संकेतस्थळावर लॉगिन प्रक्रिया पार पाडल्यावर Recruitment येथे जाऊन Railway Recruitment Cell वर क्लिक करून Engagement of Act Apprentices for 2023-24 या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर