मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याची मोठी संधी, अर्ज कसा कराल?

आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याची मोठी संधी, अर्ज कसा कराल?

Jan 25, 2024 09:01 PM IST

Mumbai Akashvani Recruitment :आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभाग अंतर्गत कार्यकारी संपादक/वृत्त निवेदन/ भाषांतरकार आदि पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

Mumbai Akashvani Recruitment
Mumbai Akashvani Recruitment

Akashvani Mumbai job Recruitment : तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई आकाशवाणीसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आकाशवाणी मुंबई  केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभाग अंतर्गत  कार्यकारी संपादक/ वृत्त निवेदन/ भाषांतरकार आदि पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

प्रसार भारतीच्यावतीने आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पत्रकारिता किंवा जन संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका किंवा पदवी प्राप्त केलेले तसेच प्रकाशन संस्था तसेच वृत्तविभागात तीन वर्षाचा कामाचा अनुभव असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ५८ वर्षाच्या आतील वयोगटातील पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज करु शकतील. अर्ज प्रक्रिया २४ जानेवारी २०२४ पासून सुरु झाली असून १५ दिवसांच्या आत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. 

इच्छुकांनी  http://applications.prasarbharati.org/ यावर अर्ज सादर करायचा आहे. तसेच या बेवसाईटवर भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

निवड झाल्यानंतर उमेदवारांना ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत प्रतिमहिना मानधन दिले जाईल. निवड झाल्यानंतर २ वर्षाचा करार करण्यात येईल. यादरम्यान उमेदवारांना अन्य संस्थेत काम करू शकणार नाही.

प्रसार भारती भरती 2024

- पदाचे नाव : : Editorial Executive/  Newsreader cum Translator(Marathi) 

पदसंख्या -३

- नोकरी ठिकाण: मुंबई आकाशवाणी.

- वयोमर्यादा:  ५८ वर्षापर्यंत.

- अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन.

- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ फेब्रुवारी २०२४.

- अर्ज पाठवण्याचा पत्ता - http://applications.prasarbharati.org/ या वेबसाईटवर अर्ज करायचा असून जर ऑनलाईन अर्ज करण्यात अडचणी येत असेल तर  nsdrnudeskapplications@gmaiJ.com  यावर ईमेल करावा.

टी-२० वर्ल्डकप २०२४