मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'हा काय घाणेरडा प्रकार आहे..' बॅनरवरून आव्हाडांचा संतप्त सवाल, वादानंतर बावनकुळेंची दिलगिरी

'हा काय घाणेरडा प्रकार आहे..' बॅनरवरून आव्हाडांचा संतप्त सवाल, वादानंतर बावनकुळेंची दिलगिरी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2023 11:00 PM IST

Jitendra awhad on viral banner : सोशल मीडियावर हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेला एक बॅनर व्हायरल होत आहे. यावरील वादानंतर बावनकुळे यांना दिलगिरी व्यक्त केली आहे.

Jitendra awhad on viral banner
Jitendra awhad on viral banner

सोशल मीडियावर हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेला एक बॅनर व्हायरल होत आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील काही तरुणांनी हा नागपुरात हा बॅनर लावला होता. या बॅनरवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो सर्वात वरच्या बाजुला व मोठा लावला होता. तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोच्या खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन फोटो लावण्यात आले होते.

हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. “हा काय घाणेरडा प्रकार आहे. बावनकुळेसाहेब, तुम्ही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्हाला हे पोस्टर मान्य आहे का?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला होता.

 

दरम्यान,हा प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आले. सोबतच बॅनरवर नावेअसलेल्या पाच व्यक्तींनी जाहीर माफीनामा लिहून देत ही चूक आमच्याकडून झालेली आहे, याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो असा माफीनामा जाहीर केला आहे. तर बावनकुळे यांनीही यावर माफी मागितली आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीच्या बॅनरवरून चंद्रशेखर बावनकुळे वादात सापडले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत बावनकुळेंवर टिका केली होती. अखेर बावनकुळेंनी या विषयावर दिलगीरी व्यक्त करत संबधीत कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करणार असल्याचं म्हटलं आहे.

IPL_Entry_Point