Walmik Karad Health : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु असून यामध्ये दररोज नवनवी प्रकरणे व खुलासे समोर येत आहेत. त्यातच या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या पोटात दुखायला लागल्याने बुधवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या वाल्मिक कराडवर सेमी आयसीयूमध्ये उपचार सुरू असून यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. कराडला अटक केली मात्र तो आता एसी आयसीयूमध्ये झोपलाय. त्याला मोकळं सोडून द्या,काय करायचं ते जनता निर्णय घेईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
वाल्मीकला आरोग्याच्या कारणास्त्व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून आव्हाडांनी निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडला मोकळं सोडून द्या,जनता फैसला घेईन. वाल्मिक कराडला अटक केली पण आता ICU मध्ये आराम करत आहे. आता कराडला मोठे मोठे आजार होतील. वाल्मिक कराडला पहिले हॉस्पिटलमधून बाहेर काढा. मी सुद्धा कराडच्या जातीचा आहे. पण कराड सारखी पैदास जातीला बदनाम करते,असे माझे स्पष्ट मत आहे. वंजारी समाजाला बदनाम करण्याचं काम सुरु आहे.
सर्व पुरावे असूनही पोलीस अटक करत नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असतो. चार्जशीटमध्ये नाव का नाही पोलिसांनी उत्तर द्यावे. महारष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडविण्याची काम सुरु आहे, असेही आव्हाड म्हणाले.
वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झाली नसून त्याच्या सिटी स्कॅन चाचणीचे रिपोर्ट डॉक्टरांना पाठवण्यात आले आहेत. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाल्मिक कराडच्या उपचाराची पुढील दिशा ठरणार आहे.
सध्या वाल्मीक कराडच्या प्रकृतीवरून चर्चा रंगली आहे. त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असतानाच, त्याचे वैद्यकीय रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली जात आहे. कराड ठणठणीत असताना आता त्याला दया कशासाठी? असा सवाल करत अंजली दमानिया यांनी कराडचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. ब्लड टेस्ट,सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्टसह सर्व माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या