Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बॉम्ब असल्याचा फोन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बॉम्ब असल्याचा फोन

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बॉम्ब असल्याचा फोन

Feb 04, 2024 07:17 PM IST

Jitendra Awhad receives bomb threat: जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बॉम्ब असल्याचा अज्ञात फोन आला.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

Jitendra Awhad News In Marathi: महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद बंगल्यामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आला. या फोनमुळे सगळीकडे एकच खळबळ माजली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली असता कोणताही संशयास्पद वस्तू आढळली नाही. ही अफवा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्यातील लक्ष्मीनगर भागात नाद बंगल्यात बॉम्ब असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बॉम्ब शोधक पथक आणि् वर्तकनगर पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी घराची तपासणी केली असता तिथे काहीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही. पोलिसांनी ही अफवा असल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची धमकी आली होती. या संदर्भात त्यांनी एक फोटो ट्वीट केला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पत्रकारांशी बोलत असताना एक गृहस्थ व्हिडिओ कॉलवर कुणाशी तरी बोलत होते.मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्या सोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हॉटेल ट्रायडंटमध्ये १९ व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाबनंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्यांच्या हाती लागला नाही, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर