मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “बल्बचा शोध कधी लागला? येड्यात काढता काय ”; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला!

“बल्बचा शोध कधी लागला? येड्यात काढता काय ”; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 07, 2022 08:54 PM IST

“बल्बचा शोध कधी लागला? काय थट्टा लावली आहे? मराठी माणसाला येड्यात काढत आहेत” असा टोलाआव्हाड यांनी ‘वेडाच मराठी वीर’ या चित्रपटावरून लगावला आहे.

‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला!
‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला!

मुंबई - कर्नाटक सीमावादापूर्वी राज्यात शिवाजी महाराजांवर बनवण्यात आलेल्या चित्रपटांवरून रणकंदन माजले होते. राज ठाकरे यांचा आवाज असलेल्या‘हर हर महादेव’ या चित्रपटातील काही दृश्यांवरआणि इतिहासातील घटनांवर आक्षेप घेत काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. काही ठिकाणी चित्रपटाचे शो बंद पाडले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांना तर ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या आरोपांखाली त्यांना अटकही करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाच एक भाग असणाऱ्या प्रतापराव गुजर यांच्या कथेवर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या कथानकावरही आक्षेप घेतला जात असताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेवरून अभिनेता अक्षय कुमारलाही नेटिझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. याच चित्रपटातील एक स्क्रीनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी खोचक ट्वीट केलं आहे.

 

प्रतापराव गुजर यांच्यासोबत सात मावळे होते की आठ यावरून वाद सुरू असतानाअक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यावरूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शिक या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार योग्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया अनेक नेटिझन्सनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. मात्र चित्रपटाच्या टीमकडून अक्षय कुमारची पाठराखण करण्यात येत आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्याआधीच चित्रपटाची मोठी चर्चा झाली आहे. जितेंद्र आव्हाडांनी चित्रीकरणा दरम्यानच्या एका दृश्यातला फोटो शेअर केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील अक्षय कुमार दिसत हे. मात्र, त्याच्यामागे लावलेल्या झुंबराला बल्ब लावल्याचं दिसून येत आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी खोचक टोला लगावला आहे.

“बल्बचा शोध कधी लागला? य थट्टा लावली आहे? मराठी माणसाला येड्यात काढत आहेत”,असा टोलाआव्हाडयांनी लगावला आहे.

IPL_Entry_Point