दाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मिकला अटक का नाही, त्याच्यावर मोक्का कधी लावणार?, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मिकला अटक का नाही, त्याच्यावर मोक्का कधी लावणार?, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

दाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मिकला अटक का नाही, त्याच्यावर मोक्का कधी लावणार?, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Dec 30, 2024 08:15 PM IST

Jitendra Awhad : सत्ताधारी दाऊदला फरफटत आणणार होते,पण वाल्मिकला ते आणू शकले नाहीत. पॉलिटिकल अंडरस्टॅन्डींग शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे,असे वातावरण त्यांनी तयार केले आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केली आहे.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

संतोष देशमुख हत्या प्रकरणातवाल्मिक कराड आरोपी आहे,मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आव्हाड म्हणाले. लोकांची मेमरी शॉर्ट आहे. लोकं विसरून जातील. याची ते वाट पाहत आहेत असे आव्हाड म्हणाले. ३०२ मध्ये वाल्मिक कराड यांचं नाव नाही. मोक्का लावू असं सभागृहात सांगितलं होतं मात्र अद्याप काहीच हालचाली नसल्याचे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी आका काका म्हणणारा नाही,मी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नाही. या हत्याप्रकरणी३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. बीड प्रकरणामध्ये आपल्या पक्षातील एका मंत्र्यावर सातत्याने आरोप होत आहेत. त्यामुळे पक्ष अध्यक्ष म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा घेणे हे अजित पवार यांचे कर्तव्य होते.

दाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मीकला का नाही -

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना बीड प्रकरणाची न्यायाधीशांद्वारे चौकशी होईल आणि आरोपींवर मोक्का लावला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तरी काहीच हालचाल नाही? खरंतर२४ तासांत ते फाईल व्हायला हवं होतं. सत्ताधारी दाऊदला फरफटत आणणार होते, पण वाल्मिकला ते आणू शकले नाहीत. पॉलिटिकल अंडरस्टॅन्डींग शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे, असे वातावरण त्यांनी तयार केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील अर्ध्याहून अधिक बूथ रिव्हॉल्वरधारी लोकांनी कॅप्चर केले होते. पण माध्यमांसमोर हे कधी आले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात लोकशाहीसाठी ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. असेही जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले.

अजित पवारांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. उलट सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांना डोळ्याने खुणावले होते. यामागे त्यांचा उद्देश काय होता? हे मला समजले नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ज्यावेळी शरद पवार साहेबांचे सरकार होते, त्यावेळी अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर शरद पवारांनी सुरेश जैन,नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

 

भाजपला निवडून दिले नसल्याने केरळ दहशतवादी राज्य -

केरळ हे राज्य साक्षरता व शिक्षणाच्या बाबतीत नंबर एकचे राज्य आहे. सर्वात जास्त सुशिक्षित लोक तिथे राहतात. भारता सर्वात जास्त फॉरेन करन्सी आणणारे हे राज्य आहे. ते दहशतवादी राज्य कसे होऊ शकते? कारण त्यांनी भाजपाला कधी निवडून दिले नाही जातीयवादी मतदार तिथे नाहीत. असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर