मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आता Jio च्या माध्यमातून घ्या पांडुरंगाचं ऑनलाइन दर्शन

आता Jio च्या माध्यमातून घ्या पांडुरंगाचं ऑनलाइन दर्शन

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 05, 2022 06:29 PM IST

भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता भाविकांना जिओ टीव्ही च्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार आहे.

जिओच्या माध्यमातून घ्या घरबसल्या विठ्ठलाचं दर्शन
जिओच्या माध्यमातून घ्या घरबसल्या विठ्ठलाचं दर्शन (हिंदुस्तान टाइम्स)

पंढरीची वारी, चुको न दे हरी असं म्हणत सध्या आषाढी एकादशी सोहळा सुरु आहे. वारीत लाखो वारकरी आपल्या विठ्ठलाला भेटायला निघाले आहेत.मात्र असेही काही वारकरी आहेत जे काही कारणास्तव विठूरायाच्या दर्शनाला जाऊ शकले नाहीत. मात्र त्यांचा हिरमोड होणार नाही याची काळजी जिओ ने घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठीच जिओने खास भेट आपल्या वारकऱ्यांना देऊ केली आहे.

भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता भाविकांना जिओ टीव्ही च्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांसाठी जिओ तर्फे ही एक अनोखी भेट असणार आहे. यानं भविकांच्या पांडुरंग भक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त एका क्लिकवर भाविकांना आपल्या देवाचं दर्शन कधीही, कुठेही घेता येणार आहे.

पंढरपूर इथं होणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि आषाढी एकादशीनंतरही सुरुच असणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे अनेकांना इच्छा असूनही विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता येत नाही. आता जिओने नेमकी हीच व्यथा लक्षात घेत भाविकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं ठरवलं आहे. आता घरबसल्या कधीही २४ तास पांडुरंगाचे दर्शन घेता येणार असून महापूजा, अभिषेक तसेच इतर विधी घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहेत.याआधी जिओ टीव्ही वर श्री अमरनाथ, चार धाम, तुळजापूर, कोल्हापूर ची महालक्ष्मी, अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा यासारख्या देवतांचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून भाविक दररोज या देवतांचे लाईव्ह दर्शन घेतात.आता पांडुरंगाचंही दर्शन तुम्हाला घेता येणार आहे

 जिओ टीव्ही अँप डाउनलोड करून तसेच क्यू आर कोड स्कॅन करून देखील लाईव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.जिओ टीव्ही वर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविक 'दर्शन' आयकॉन वर क्लिक करून विठ्ठल रुक्मिणी चॅनेल वर जाऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हालाही जर तुमच्या आवडत्या देवाचं दर्शन घ्यायचं असले तर नक्की जिओ अॅपला भेट द्या.

 

 

 

 

IPL_Entry_Point