Jejuri : जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला; पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी, आज आंदोलन
Jejuri News: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जेजूरी येथे गुरुवारी रात्री खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तपदाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शहरातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते.
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या. मात्र, या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील ६ जणांच्या निवडी राजकीय हस्तेक्षेपामुळे करण्यात आली. परिणामी जेजुरीत याबाबत नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, हे नवे विश्वस्त गुरुवारी रात्री पदभार घेण्यासाठी आले होते. मात्र, संतप्त स्थानिकांनी या विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, या विश्वस्त निवडीच्या विरोधात आज जेजूरी शहरात रास्ता रोको, चक्री उपोषण करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. दरम्यान, जेजुरी शहर भाजप अध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राज्यातील मार्तंड देवस्थान हे मोठे देवस्थान आहे. येथील कारभार पाहण्यासाठी विश्वस्त निवड नुकीतीच घेण्यात आली. मात्र, यात स्थानिकांना डावलत बाहेरच्या नागरिकांना संधि देण्यात आल्याने स्थानिकांमद्धे धुसफूस सुरू होती. दरम्यान, गुरुवारी रात्री ही धुसफूस बाहेर पडली. निवडण्यात आलेले बाहेरील विश्वस्त पदभार घेण्यासाठी आले असता, स्थानिकांचा असंतोष बाहेर पडला. नागरिकांनी निवडण्यात आलेल्या या विश्वतांच्या विरोधात रात्री घोषणाबाजी केली. एवढेच नाही तर ग्रामसभा घेत आजपासून रास्ता रोको आणि साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Pune Crime : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पंजाब आणि बिहारमधील ६ बुकिंच्या मुसक्या आवळल्या
जेजूरी देवस्थानात सात विश्वस्तांपैकी ५ ते ६ विश्वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. तसेच ते बाहेरील रहिवासी आहेत, असा आरोपी ग्रामस्थांचा आहे. निवडीमध्ये एकच विश्वस्त स्थानिक निवडला आहे. जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना राजकीय हस्तक्षेपाने डावलले गेले आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे.
विश्वस्त माघारी फिरले
ग्रामसभा झाल्यानंतर गुरुवारी रात्री विश्वस्तपदाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देवस्थानाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जेजुरीकर उपस्थित होते. जेजुरीकरांचा विरोध पाहून विश्वस्त माघारी परतले. आता, शुक्रवारपासून जेजुरीत साखळी उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.