Jayant Patil on Malik : तुरुंगातून बाहेर येताच नवाब मलिक अजित पवार गटात सामील? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jayant Patil on Malik : तुरुंगातून बाहेर येताच नवाब मलिक अजित पवार गटात सामील? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil on Malik : तुरुंगातून बाहेर येताच नवाब मलिक अजित पवार गटात सामील? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Published Oct 07, 2023 04:51 PM IST

Jayant Patil on Nawab malik : नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे तेकोणाच्या गटात आहेत, याचे कुठे भाष्य केलेले नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

Jayant patil 
Jayant patil 

राष्ट्रवादीवर कोणाचा हक्क यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकही अजित पवार गटात सामील झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत जयंत पाटलांना विचारले असता त्यांनी म्हटले की,नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे.  त्यामुळे ते कोणाच्या गटात आहेत, याचे कुठे भाष्य केलेले नाही. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जातअसल्याचं मला मीडियामधूनच समजत आहे.

जयंत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीबाबत भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीत शरद पवार यांची बाजू मजबूत आहे. यात शंका घेण्यासारखं काहीच नाही. पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रे दिली आहेत, त्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

 

जयंत पाटील म्हणाले शरद पवारांच्या नेतृत्वामुळेच आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे. त्यांना सोडून गेलेले मागील १७ ते १८ वर्षे मंत्रिपदावर राहिलेले आहेत. त्यावेळी शरद पवारांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही. आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार केला आहे तो भारतातील जनता कदापि मान्य करणार नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर