- शिरूर तालुक्याचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना पठाणकोटमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत यांना वीरमरण आले.
पुणे - जम्मू आणि काश्मीरमधून एक मन सुन्न बातमी आली आहे. महाराष्ट्राच्या शिरूर तालुक्याचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना पठाणकोटमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे. सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत यांना वीरमरण आले.
ट्रेंडिंग न्यूज
सूर्यकांत शेषराव तेलंगे (वय३५)हे मूळचे शिरूर तालुक्यातील थेरगाव येथील होते. आज सकाळी झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना सूर्यकांत हे शहीद झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली. गावातील सर्वांनी दुकाने बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सूर्यकांत हे२००७ मध्येसैन्यात भरती झाले होते. त्यांनी सैन्य प्रशिक्षण महाड येथे घेतले होते. तसेच २०१४साली त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई,वडील पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांच्या शहीद होण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.