Dahi handi : गोविंदांसाठी महत्त्वाचे! दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, 'या' गोष्टी करणे टाळा-janmashtami 2024 dahi handi mumbai police issued advisory rules and regulations for celebrations ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dahi handi : गोविंदांसाठी महत्त्वाचे! दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, 'या' गोष्टी करणे टाळा

Dahi handi : गोविंदांसाठी महत्त्वाचे! दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, 'या' गोष्टी करणे टाळा

Aug 23, 2024 09:45 AM IST

Mumbai Janmashtami police advisory : मुंबईत दहीहंडी जल्लोषात साजरी केली जाते. या वर्षीही हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जारी! 'या' गोष्टी करणे टाळा
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जारी! 'या' गोष्टी करणे टाळा (PTI)

Mumbai Janmashtami police advisory : मुंबईत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. पुढील मंगळवारी हा सण उत्साहात अवघ्या महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असून या दिवशी राज्यात दहीहंडीचा जल्लोष असणार आहे. त्यामुळे मुंबईत गैरप्रकार टाळण्यासाठी व हा सण शांततेत साजरा होण्यासाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास कठोर कारवाई होणार आहे.

मुंबईत दहीहंडीचा जल्लोष राज्यात सर्वाधिक असतो. शहरात ठिकठिकाणी विविध मंडळातर्फे या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. उंचावर असलेली ही दहीहंडी फोडण्यासाठी उंच मानवी मनोरे तयार केले जातात. यात विविध गोविंदा पथके सहभागी होत असतात व या हंड्या फोडत असतात. यासाठी त्यांना मोठे बक्षीस देखील दिले जाते. नागरिक सार्वजनिक ठिकाणी ठिकाणी होणाऱ्या या उत्सवात गोविंदा यांच्या अंगावर रंगीत पाणी फेकतात. बऱ्याचदा यावरून वाद होतात. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अनेक वाद होत असतात. यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. यावर्षी दहीहांडीचा जल्लोषात साजरा होत असतांना गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनातर्फे पावले उचलली असून काही नियमावली जारी करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली ?

यावर्षी २६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या दिवशी मध्यरात्रीपासून ही नियमावली लागू करण्यात येणार असून ती २७ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे या नियमांच उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या काळात जर सार्वजनिकरित्या अश्लील शब्द उच्चारणे, विविध घोषणा देणे किंवा अश्लील गाणी गाणे, हातवारे किवा नक्कल करणे विविध प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू वापरुन सार्वजनिक शांततेला भंग पोचवणे, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर रंगाचे पाणी फेकणे, पाण्याने भरलेले फुगे फेकणे या सारख्या अनेक बाबींना बंदी घालण्यात आली आहे. असे करतांना कुणी आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे.

पोलिस प्रशासन सज्ज

मुंबईत २७ तारखेला साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी सणाच्या पार्श्वभमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जानर आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेला जर कुणी गालबोट लावले किंवा कायद्याला आव्हान देणाऱ्या गोष्टी केल्या त्र त्यांची हयगय केली जाणार नसल्याचं पोलिस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर एकहिल कठोर कारवाई केली जाणार आहे.

विभाग