गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेण्यास विरोध; सरकारनं शाळांना निर्देश द्यावेत! जनता दलाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेण्यास विरोध; सरकारनं शाळांना निर्देश द्यावेत! जनता दलाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेण्यास विरोध; सरकारनं शाळांना निर्देश द्यावेत! जनता दलाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Updated Sep 04, 2024 05:55 PM IST

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या काळात काही शाळांनी परीक्षा ठेवल्यामुळं पालकांची मोठी अडचण झाली आहे. जनता दल सेक्युलरनं हा मुद्दा शिक्षणमंत्र्याकडं उपस्थित केला असून शाळांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा न घेतल्या जाऊ नयेत; जनता दलाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा न घेतल्या जाऊ नयेत; जनता दलाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाबाळांसह गावाकडं जातात. त्यामुळं या कालावधीत शाळांमध्ये परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र पक्षानं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडं केली आहे.

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव तोंडावर आला आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी गणरायाचं आगमन होत असून अनंत चतुर्दशी (विसर्जन) १७ सप्टेंबर रोजी आहे. या कालावधीत कॉन्व्हेन्ट शाळा वगळता बहुतेक शाळांना पहिले पाच दिवस म्हणजे ११ तारखेपर्यंत सुट्टी आहे. तसंच, १५ (रविवार), १६ (ईद) व १७ तारखेला अनंत चतुर्दशी निमित्त सुटी आहे. सीबीएसई शाळांमध्ये तर शनिवार १४ सप्टेंबर रोजीही सुटी आहे. 

सलग सुट्ट्या असल्यामुळं अनेक पालकांनी गणपतीसाठी गावाकडं जाण्याचं नियोजन केलं आहे. ज्यांच्याकडं गणपती नाही, त्यांनी इतर नियोजन केलं आहे. मात्र, काही शाळांमध्ये नियमावर बोट ठेवून, १२ व १३ तारखेला एक वा दोन विषयांची परीक्षा घेतली जाणार असल्याचं निदर्शनास आलं आहे.

एका पेपरसाठी संपूर्ण सुट्टीवर गंडातर कशासाठी?

विरार, बोळींज येथील मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल या शाळेत १३ तारखेला एका विषयाची परीक्षा असून नंतर १४, १५, १६ व १७ सप्टेंबर असे सलग चार दिवस शाळेला सुट्टी आहे. त्यामुळं केवळ एकच पेपर १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामुळं गणपतीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्या पालकांची व त्यांच्या पाल्यांची अडचण होणार आहे.

बाहेरगावी जाणारे पालक आपल्या येण्या-जाण्याच्या रेल्वे व बसच्या तिकिटाचे आगाऊ बुकिंग करून ठेवतात. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात सर्वच गाड्यांना गर्दी असल्यामुळं ऐनवेळी पालकांना तिकिटं मिळणार नाहीत. त्यामुळं त्यांची अडचण होणार आहे. जनता दल (से)च्या पदाधिकाऱ्यांनी ही बाबा शिक्षणमंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी संबंधितांना योग्य सूचना द्याव्यात!

गणेशोत्सवानंतरच परीक्षांचं नियोजन करण्याच्या सूचना विरार येथील मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूलसह सर्व शाळांना द्याव्यात, अशी विनंती जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर