मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, पिकांचे मोठे नुकसान; वीज कोसळून दोघांचा मृत्यू

भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, पिकांचे मोठे नुकसान; वीज कोसळून दोघांचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 26, 2024 10:48 PM IST

Hailstorm in Jalna : भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जालना जिल्ह्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाका बसला. भोकरदन तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व  गारपिटीमुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. कुंभारी व सिपोरा बाजार येथे या घटना घडल्या. 

भोकरदन तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपिट झाली. कुंभारी गावातील विवाहिता पल्लवी विशाल दाभाडे (वय २१) या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. महिला घराजवळील शेतातून घरी जात असताना ही घटना घडली. अंगावर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याने तिच्या दो वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून मातृक्षत्र हरपले आहे. दुसऱ्या घटनेत सिपोरा बाजार येथील शिवाजी गनपत कड (वय ३८ ) यांचा शेतात काम करत असतानाच अंगावर वीज पडून मृत्यू झाला. 

 भोकरदन, पारध, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, पद्मावती, सावंगी, दानापूर, वालसावंगी, आदी परिसरत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. 

IPL_Entry_Point

विभाग