Manoj Jarange Patil:जरांगे पाटलांना धक्का ! पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यावर अंतरवालीसह 'या' दोन गावांनी सोडली साथ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Patil:जरांगे पाटलांना धक्का ! पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यावर अंतरवालीसह 'या' दोन गावांनी सोडली साथ

Manoj Jarange Patil:जरांगे पाटलांना धक्का ! पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यावर अंतरवालीसह 'या' दोन गावांनी सोडली साथ

Published Jun 07, 2024 11:22 AM IST

Maratha OBC Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करुन राज्यभरात मोठे वादळ निर्माण केले होते. ते ८ तारखे पासून पुन्हा आंदोलन करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे. तसेच दोन गावांनी देखील त्यांची साथ सोडली आहे.

मनोज जरांगे पाटील हे ८ तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषण करणार होते. मात्र, त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मनोज जरांगे पाटील हे ८ तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषण करणार होते. मात्र, त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Manoj Jarange Patil news: राज्य सरकारने मराठा आरक्षण मुद्यावरून तातडीने निर्णय घ्यावा यासाठी मनोज जरांगे पाटील हे ८ तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषण करणार होते. मात्र, आंतरवाली सराटी ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध करत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. यामुळे पोलिसांनी त्यांना उपोषण करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याची चर्चा सुरू असतांना आणखी दोन गावांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांना धक्का बसला आहे.

Pune Gold smuggling : काय सांगता! चक्क विमानाच्या सीट खाली दुबईहून पुण्याला आणले १ किलो सोने! मुद्देमालासह एकाला अटक

मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार होते. मात्र, येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्या उपोषणास परवानगी नाकारावी अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करणार परवानगी नाकारली. आंतरवाली सराटीत नंतर आता जरांगे पाटील यांच्या उपोषणास आता आणखी दोन गावाने विरोध केला आहे. वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी मिळू नये यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.

MLC election : फडणवीसांच्या भेटीनंतर कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून राज ठाकरे यांच्या उमेदवाराची माघार

अंतरवलीसह वडीगोद्री आणि दोडगाव गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता या आंदोलनास परवानगी देण्यात येऊ नये असे म्हटले होते. या सोबतच जातीय सलोखा देखील बिघडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या देखील आहेत.

जरांगे पाटील उपोष्णावर ठाम

पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी नाकारली असली तर पाटील हे त्यांच्या उपोष्णावर ठाम आहेत. ते चार जूनपासून उपोषणाला बसणार होते. मात्र अचारसहिंतेमुळे ते ८ जून पासून उपोषण करणार होते. आता पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर