तरुणांमध्ये व्यसनाधीनता व त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. जालन्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुटख्याच्या पुडीसाठी झालेल्या वादातून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मित्रानेच त्याचा चाकूने भोसकून खून केला. जालना शहराच्या जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात ही घटना घडली.
दिलिप हरिभाऊ कोल्हे (वय २३ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अरविंद लक्ष्मण शेळके असं आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याची पुडीवरून दोघांमध्ये वादावादी झाली. वाद इतका वाढला की, याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर अरविंदने दिलीपच्या छातीत चाकू खुपसला. दिलीप रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीने साथीदारांसह पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दिलीपचा जागीच मृत्यू झाला होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला गेला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना चुकून झालेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ठाण्यातील वागळे इस्टेट येथे घडली. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कंपनी मालक मोहम्मद उमर शेख (५०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) यांच्यासह बिपीन कुमार जयस्वाल (२१ रा. रुपादेवी पाडा, ठाणे) आणि राहूल कुमार जयस्वाल (२३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) हे तिघेजण जखमी झाले आहेत.