Jalna Accident : जालन्यात बस-ट्रकच्या भीषण अपघातात ५ ठार, १४ जखमी; दोन्ही गाड्यांचा चक्काचूर-jalna accident collision between bus and truck 5 killed 14 injured death toll feared to rise ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna Accident : जालन्यात बस-ट्रकच्या भीषण अपघातात ५ ठार, १४ जखमी; दोन्ही गाड्यांचा चक्काचूर

Jalna Accident : जालन्यात बस-ट्रकच्या भीषण अपघातात ५ ठार, १४ जखमी; दोन्ही गाड्यांचा चक्काचूर

Sep 20, 2024 11:53 AM IST

Jalna Accident : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गवारील शहापूर येथे आज सकाळी घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

 जालन्यात बस-ट्रकचा भीषण अपघातात ५ ठार १४ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; दोन्ही वाहनांचा चक्काचूर
जालन्यात बस-ट्रकचा भीषण अपघातात ५ ठार १४ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Jalna Accident : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गवारील शहापूर येथे आज सकाळी घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर १४ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. घटनास्थळाचे चित्र भीषण होते. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. काही नागरिक गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कसा झाला अपघात ?

जालना वडीगोद्री मार्गावरील शहापूरजवळ बस व आयशर ट्रकचा अपघात झाला. अपघात ग्रस्त बस ही गेवराईकडून अंबडकडे जात होती. तर एक मोसंबी भरुन जाणारा ट्रक या मार्गाने जात होता. या दोन्ही वाहनांची समोरा समोर धडक झाली. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने जखमींना दवाखान्यात दाखल केले. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी देखील बचाव कार्य सुरू केले आहे. ही दोन्ही वाहने समोरा समोर आल्याने अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नगरिकांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

आयफोन-16 खरेदीसाठी मुंबईत ॲपल स्टोअरबाहेर झुंबड, नागरिकांच्या लागल्या रांगा; व्हिडिओ व्हायरल

ओव्हरटेकच्या नादात अपघात

भरधाव वेगाने येणारा आयशर ट्रक हा त्याच्या समोरील दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी समोरून येणाऱ्या बसवर हा ट्रक जाऊन आदळला. या बसमध्ये एकूण २४ प्रवाशी होते. यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Whats_app_banner