Jalna Accident: जालन्यात एसटी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, २० जण जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna Accident: जालन्यात एसटी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

Jalna Accident: जालन्यात एसटी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

Dec 14, 2024 05:23 PM IST

Jalna Bus and Tempo Accident: जालन्यात बस आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

जालन्यात एसटी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक
जालन्यात एसटी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक

Jalna Accident News: जालन्यात एसटी बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जालना- सिंदखेडराजा रोडवर नाव्हा हा अपघात घडला. टेम्पोचालक मद्य पिऊन वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

अपघातग्रस्त बस छत्रपती संभाजीनगरहून माहुरगडकडे जात होती. तर, टेम्पो सिंदखेडराजावरून जालनाच्या दिशेने जात होता. या अपघातात एसटी महामंडळाच्या बसचा समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, २० जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची समजत आहे.

देशात गेल्या वर्षी रस्ता अपघातात जवळपास २ लाख लोक ठार

देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.

देशात सर्वाधिक अपघात कुठे, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर