मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon: दोन मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध, अडथळा ठरणाऱ्या पतीला विहिरीत ढकललं, १० दिवसांनी हत्येचा उलगडा

Jalgaon: दोन मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध, अडथळा ठरणाऱ्या पतीला विहिरीत ढकललं, १० दिवसांनी हत्येचा उलगडा

Jun 14, 2024 06:42 PM IST

Jalgaon Women Kills Husband: जळगावातील धरणगावात विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने पतीला विहिरीत ढकलून त्याची हत्या केली.

जळगावात विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या
जळगावात विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या

Jalgaon Dharangaon Murder: जाळगावच्या भवरखेडा तालुक्यातील धरणगाव येथील घटनेने सर्वांना हादरून टाकले. दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक केली. आरोपी महिलेचे माहेरच्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे समजत आहे. मात्र, पती अडथळा ठरत असल्याने आरोपी महिलेने त्याला मंदिरात दर्शनासाठी जायचे सांगून शेतात नेल आणि विहिरीत ढकलून दिले. ही घटना २ जून २०२४ रोजी दुपारच्या सुमारास घडली.

प्रकाश धोबी (वय, ३६) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश हा दिव्यांग असून तो त्याची पत्नी आणि दोन मुलांसह जळगावातील भावरखेडा गावात वास्तव्यास होता. दरम्यान, २ जूनला ज्योती प्रकाशला घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने घेऊन गेली. ज्योतीच्या माहेरच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती प्रकाशला होती. मंदिराजवळ पोहोचताच दोघांमध्ये वाद सुरू झाला. यातून ज्योतीने प्रकाशला विहिरीत ढकलून दिले.

ट्रेंडिंग न्यूज

प्रकाश गावात दिसत नसल्याने त्याच्या चुलत्याने बुधवारी १२ जून २०२४ रोजी धरणगाव पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संशयित लोकांना चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी पोलिसांना ज्योतीच्या वागणुकीवर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता ज्योतीने पतीच्या हत्येची कबूली दिली.चौकशीत तिनेच पतीला विहिरीत ढकलून दिल्याची कबूली दिली. तब्बल १० दिवसानंतर प्रकाशच्या हत्येचा उलगडा झाला. दोन मुलांच्या आईने विवाहबाह्य संबंधातून चक्क पतीला विहिरीत ढकलून हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली.

मुंबई: नशा न करण्याचा सल्ला देणाऱ्या मित्राची हत्या

मुंब्य्रातील आंबेडकर डोंगर परिसरात रविवारी एका तरुणाचा मृतदेह सापडला. मृत तरुणाच्या शरिरावरील जखमा पाहून त्याची हत्या करण्यात आली, असा पोलिसांना संशय आला. मेहताब मंसुरी (वय, १५) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. मुंब्रा पोलिसांनी मेहताबच्या हत्येचा उलगडा केला. मेहताबच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याची चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी फैज सुलतान मलिक (वय, २३) याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फैजला नशा करण्याचे व्यसन होते. तर, मेहताबने त्याला हे सवयी सोडून देण्याचा सल्ला दिला. परंतु, फैजला हे खटकले आणि त्याने मेहताबची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर