Jalgaon train accident : जळगावमधील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यातून धूर निघाल्यानंतर आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या निघाल्या.
जळगावात पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने अनेक प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यांना कर्नाटक एक्सप्रेसने चिरडल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
पाचोरा स्टेशनच्या पुढे १० किमीवर परथाडे हे एक छोटं स्टेशन असून तेथे हा अपघात झाला आहे.मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये कुणीतरी ओरडले की, ट्रेनमध्ये आग लागली आहे. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून रेल्वे रुळावर उड्या मारल्या. पण त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडले. ही दुर्घटना जळगाव जिल्ह्यातील परांडा रेल्वे स्टेशनजवळ झाली आहे. याअपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पुष्पक एक्सप्रेस पाचोरा स्थानकावर थांबवण्यात आली आहे.
पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने रुळावर घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना ट्रेनमध्ये आग लागल्याची भाती वाटली त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करत चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडले.
या अपघातामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरूवात केली,तेव्हाच समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती,या एक्सप्रेसखाली काही प्रवासी आले,ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जखमी १२ जणांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंगळुरू एक्सप्रेसने हॉर्न वाजवला नसल्याचे सांगितले जात आहे.
पाचोरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, २० हून अधिक जणांनी संथ गतीने जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली आल्याने २० जण जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर काही प्रवाशांनी हळू चालणाऱ्या ट्रेनमधून उडी मारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली काही प्रवासी आले. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या