चहा विक्रेत्यानं पसरवली अफवा अन् प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, धावत्या रेल्वेतून मारल्या उड्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चहा विक्रेत्यानं पसरवली अफवा अन् प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, धावत्या रेल्वेतून मारल्या उड्या

चहा विक्रेत्यानं पसरवली अफवा अन् प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, धावत्या रेल्वेतून मारल्या उड्या

Jan 23, 2025 10:16 AM IST

Jalgaon Train Accident : जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. रेल्वेत आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. यावेळी दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली.

चहा विक्रेत्यानं दिली आगीची माहिती अन् प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, धावत्या रेल्वेतून मारल्या उड्या
चहा विक्रेत्यानं दिली आगीची माहिती अन् प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, धावत्या रेल्वेतून मारल्या उड्या

Jalgaon Train Accident : जळगावमधील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी मोठी रेल्वे दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यात आग लागल्याच्या अफवेने जिवाच्या भीतीने अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं. यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही अफवा नेमकी कुणी पसरवली या बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जळगावात पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने मोठा गोंधळ उडाला. या अफवेमुळे प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. यावेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना अक्षरश: चिरडले. घटनास्थळावरचे दृश्य भयंकर होते. याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

चहा विक्रेत्याने पसरवली अफवा

पुष्पक एक्सप्रेस ही गाडी पाचोरा रेल्वे स्थानकावरून सुटली. थोड्या अंतरावर असलेल्या परथाडे स्थानकावर ही गाडी आली तेव्हा गाडीचा वेग कमी होता. यावेळी गाडीतील चहा विक्रेत्याने गाडीत आग लागल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला व त्यांनी जिवाच्या भीतीने रेल्वेतून पटापट उड्या मारल्या. मोठ्या प्रमाणात प्रवासी दुसऱ्या ट्रॅकवर येऊन थांबले. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडलं. यात तब्बल १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

असा झाला अपघात

पाचोरा स्टेशन जवळच काही अंतरावर परथाडे हे छोटे रेल्वे स्थानक आहे. या वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये चहा विक्रेत्याने गाडीत आग लागल्याचं सांगितलं. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उतरले आणि बाजूच्या ट्रॅकवर गेले. मात्र, याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवर येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडले. ही घटना जळगाव मधील परांडा रेल्वे स्थानकाजवळ घडली. या अपघातात एकूण २५ प्रवाशी जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर पाचोरा व जळगाव येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री उशिरापर्यंत या अपघातात मृत्यू झालेल्या सर्व प्रवाशांचे शव विच्छेदन करण्यात आले. आज त्यांचे मृतदेह हे त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार आहे. तर काही शव हे नेण्यापलिकडे असल्याने त्यांच्यावर त्यांचे नातेवाईक हे जळगाव येथेच अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवाशी हे उत्तर भारतातील तर तिघे जण हे नेपाळ येथील आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर