मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon House Collapsed: जळगावात वादळी वाऱ्यामुळे घर कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Jalgaon House Collapsed: जळगावात वादळी वाऱ्यामुळे घर कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

May 27, 2024 01:18 PM IST

Four Dead in House Collapse In Jalgaon: जळगावच्या यावल परिसरात वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण सुदैवाने बचावला आहे.

 जळगावात वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे.
जळगावात वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे.

Yawal House Collapsed: जळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत आठ वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला आहे. यावल तालुक्यातील थोरपाणी परिसरात रविवारी (२६ मे २०२४) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नानसिंह गुला पावरा (वय, २८) त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा (वय, २२) आणि त्यांचा मुलगा रतीलाल पावरा (वय, ३), मुलगी बालीबाई (वय, २) अशी या घटनेत मरण पावलेल्यांची नावे आहेत. रविवारी संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग आपल्या कुटुंबासह दरवाजा बंद करून घरात बसला. मात्र, तितक्यात होत्याचे नव्हते झाले. वादळी वाऱ्यामुळे घर कोसळल्यामुळे नानसिंग, सोनूबाई, रतीलाल, बालीबाई आणि शांतीलाल (वय,८) ढिगाऱ्याखाली अडकले. शांतीलाल कसाबसा ढिगाऱ्यातून बाहेर आला आणि मदतीसाठी आरोळ्या मारून परिसरातील लोकांना बोलावून घेतले. त्यानंतर स्थानिक लोकांनी नानसिंग, सोनूबाई, रतीलाल आणि बालीबाई यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला. श्‍वास घेण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे या चौघांचाही गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेची माहिताच तहसीलदार मोहनमाला नाझरकर आणि पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले. नानसिंहचे वडिल आणि इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनानंतर चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मयतांचा वारसदार शांतीलाल पावराला शासकीय नियमानुसार आर्थिक मदत मिळावी. तसेच त्याच्या शिक्षणासह उपजिविकेची जबाबदारी शासनाने उचलावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

पुणे: पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

पुण्यातील वाघोली येथील खाणीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२० मे २०२४) दुपारी घडली. अली अहमद शेख (वय १२), कार्तिक दशरथ दुखरे (वय १२) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. अली आणि कार्तिक हे दोघेही वाघोली येथील शिवरकर वस्ती येथे वास्तव्यास होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग