मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon Crime: नवऱ्यानं स्वत:साठी आणलेली दारू बायको प्यायली; त्यानंतर जे घडलं ते पाहून गाव हादरलं

Jalgaon Crime: नवऱ्यानं स्वत:साठी आणलेली दारू बायको प्यायली; त्यानंतर जे घडलं ते पाहून गाव हादरलं

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 20, 2023 05:07 PM IST

Drunken husband kills Wife: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूत गावात दारुड्या नवऱ्याने बायकोची गळा आवळून हत्या केली.

crime news
crime news

Jalgaon Murder: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूत गावात रविवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. स्वत:साठी आणेलेली दारू बायको प्यायल्याने संतापलेल्या नवऱ्याने तिची हत्या केली. त्यानंतर सर्पदंशाने तिचा मृत्यु झाल्याचा बनाव रचला. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालात मारहाण आणि गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली. 

ट्रेंडिंग न्यूज

जितेंद्र गंगाराम हेमब्रम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो पत्नी शांतीदेवी हिच्यासोबत सोबत भुसावळ तालुक्यातील हतनूर गावात राहत होता. हतनूर धरणाच्या वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याच ठिकाणी जितेंद्र हेमब्रम आणि शांतीदेवी हे दाम्पत्यदेखील मजुरीचे काम करुन उदरनिर्वाह भागवते. दरम्यान, रविवारी दुपारी हेमब्रमने स्वत:साठी दारू आणली. मात्र, ही दारू शांतीदेवी प्यायली. यामुळे हेमब्रमला राग अनावर झाला. त्याने शांतीदेवीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिचा गळा आवळला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

यानंतर आरोपी हेमब्रमने शांतीचा देवाची मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी शांतीदेवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. ज्यामुळे आरोपी हेमब्रमचे पितळ उघडे पडले. शवविच्छेदनाच्या अहवालात शांतीदेवीचा मृत्यू बेदम मारहाण आणि गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी हेमब्रमला अटक करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पुणे: दारू पिताना बायकोबद्दल अश्लील बोलणाऱ्या मित्राची हत्या

सहा महिन्यापूर्वी नाशिक फाटा पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? याचा पोलीस गेल्या काही महिन्यांपासून शोध घेत होते. अखेर या घटनेचा उलगडा झाला असून संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मृताने दारूच्या नशेत आरोपीच्या पत्नीबाबत अश्लील शब्द वापरले. यातून निर्माण झालेल्या वादातून आरोपीने मृताला पूलावरून खाली ढकलून दिले.

WhatsApp channel

विभाग