मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balu More: अज्ञातांच्या गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचं निधन

Balu More: अज्ञातांच्या गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचं निधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 10, 2024 01:30 PM IST

BJP Ex-Corporator Balu More Dies: जळगावच्या चाळीसगावात गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या नगरसेवकाची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.

Jalgaon Chalisgaon Firing News
Jalgaon Chalisgaon Firing News

BJP Ex-Corporator Dies In Firing: भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांची मृत्युची झुंज अपयशी ठरली. तीन दिवसांपूर्वी जळगावातील चाळीसगावात त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात बाळू मोरे गंभीररित्या जखमी झाले होते. यानंतर त्यांना त्वरीत नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बाळू मोरे उर्फ महेंद्र मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. दरम्यान, बाळू मोरे हे बुधवारी (७ फेब्रुवारी २०२४) त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बाळु मोरे यांच्यावर ८ गोळ्या झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात बाळु मोरे गंभीर जखमी झाले. अंदाधुंद गोळीबारात त्यांच्या छातीला, पोटाला आणि पायाला गोळी लागली. त्यांना त्वरीत नाशिक येथील अशोका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीन दिवसानंतर उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली. गोळीबाराच्या घटनेनंतर चाळीसगाव शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये घबराट आहे. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.

महिन्याभरात महाराष्ट्रातील चौथी घटना

यापूर्वी पु्ण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची त्यांच्याच साथीदाराने ढिवसाढवळ्या भररस्त्यात हत्या केली. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकात शिंदे गटातील कार्यकर्ते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असताना अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. यातच बाळू मोरे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

WhatsApp channel

विभाग