Jalgaon Accident News: जळगावात दुचाकी आणि डंपरमध्ये यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील फुफनगरी फाट्याजवळ हा अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या डंपरला धडक दिली. या धडक इतकी भीषण होती की, दोन तरुणांचा मृत्यू झाला. पंकज शंकर कोळी (वय, २६) आणि अमोल आनंदा कोळी (वय, २७) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत. दोघेही जळगाव तालुक्यातील घार्डी गावातील रहिवासी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. त्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या