Fatka Gang : फटका गँगमुळे तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या जगनचे दोन्ही पाय निकामी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fatka Gang : फटका गँगमुळे तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या जगनचे दोन्ही पाय निकामी

Fatka Gang : फटका गँगमुळे तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या जगनचे दोन्ही पाय निकामी

May 26, 2024 11:40 AM IST

Fatka Gang At Mumbai Local: मुंबईतील फटका गँग रेल्वे प्रवाशांच्या जिवावर उठली आहे. या गँगमुळे एका तरुणाला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

मुंबईतील फटका गँग रेल्वे प्रवाशांच्या जिवावर उठली आहे. या गँगमुळे एका तरुणाला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
मुंबईतील फटका गँग रेल्वे प्रवाशांच्या जिवावर उठली आहे. या गँगमुळे एका तरुणाला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

Fatka Gang At Mumbai Local: मुंबईत रेल्वे स्थानकावर आणि लोकलमध्ये असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल लुटणाऱ्या फटका गँग प्रवाशांच्या जिवावर उठले आहेत. मुंबईच्या शिवाजी मंदिरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये कामास असणाऱ्या एका तरुणाचे आयुष्य हे या चोरट्यामुळे उध्वस्त झाले आहे. ठाणे स्थानकाजवळ मोबाईल चोरट्यांनी लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाच्या हातावर काठी मारल्याने प्रवाशांचा तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेले. या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या तरुणाचा जीव वाचला असला तरी तो आयुष्यभरसाठी अधू झाला आहे.

Delhi Hospital Fire : दिल्लीत मुलांच्या रुग्णालयात अग्नितांडव! ७ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

जगन जंगले (वय ३१) असे या तरुणाचे नाव आहे. जगन हा कामावरून दादर- कल्याण लोकलने घरी येत होता. ठाणे स्थानकाजवळ लोकलमध्ये असतांना फटका गँगच्या मोबाईल चोरट्यांनी लोकलच्या दारात उभ्या असलेल्या जनगच्या हातावर काठी मारली. यामुळे त्याचा तोल जाऊन जगन खाली पडला. या दरम्यान, लोकल त्याच्या पायावरुन गेल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेले. जगनचे तीन महिन्यापूर्वी लग्न झाले होते.

Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी रेड! तब्बल ५०० कोटींचे घबाड लागले हाती; पैसे मोजून अधिकारीही थकले

या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. जगन हा २२ मे रोजी दादर स्थानकातून कल्याणला जाणारी लोकल पकडून घरी जात असतांना ठाणे स्थानकात ही घटना घडली. जगन हे फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्याचवेळी त्यांचा मोबाइलही गहाळ झाला. लोकलचे चाक जगनच्या पायावरून गेले. ही घटना रेल्वे पोलिसांना कळल्यावर काही प्रवाशांच्या मदतीने जगनला तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली मात्र, त्याचे पाय वाचवण्यात त्यांना अपयश आले.

या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जगन याला नेमके कुणी मारले, त्याचा मोबाइल कोणी हिसकावला याचा तपास केला जात आहे. जगन हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून तो कमवणारा देखील एकटाच आहे. त्याचे आई वडील शेतकरी असून घरची परिस्थिती हालाकीची आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर