पुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून संपवले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून संपवले!

पुण्यातील आयटी कंपनीत थरार! सहकारी तरुणीला पार्किंगमध्ये गाठले आणि चाकूने वार करून संपवले!

Jan 08, 2025 10:38 AM IST

Pune Yerwada Crime news : पुण्यात एका कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर धार धार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. यात गंभीर जखमी झाल्याने या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात आयटी कंपनीत तरुणीवर कोयत्याने हल्ला! रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू
पुण्यात आयटी कंपनीत तरुणीवर कोयत्याने हल्ला! रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू

Pune Yerwada Crime news : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. मंगळवारी पुण्यातील येरवडा येथील प्रसिद्ध आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या आवारात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे घटना ?

शुभदा कोदारे (वय २८) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा कनोजा (वय ३०) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा कनोजा हा शुभदाचा सहकारी आहे. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. मंगळवारी संध्याकाळी शुभदा ही काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती. यावेळी आरोपी कृष्णा तिथे आला. त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणारा चाकू होता. शुभदा हिला त्याने मध्येच अडवले. तसेच तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हातात असलेल्या चाकूने त्याने वार केले. या घटनेत शुभदा ही गंभीर जखमी झाली. शुभदा ही खाली कोसळली. तिला तिच्या इतर सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पैशाच्या वादातून हत्या

पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना झाल्याने आता कंपनीच्या आवारात देखील मुली सुरक्षित नसल्याचं उघडं झालं आहे. शुभदा कोदारे व तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा यांच्यात काही आर्थिक वाद होते. शुभदा कोदारे ही येरवडा परिसरातील एका मोठ्या आयटी कंपनीत अकांऊटंट होती. तर तिचा सहकारी कृष्णा कनोजा हा देखील तिच्या सोबत काम करत होता. दोघांमध्ये पैशावरुन वाद सुरू होता. या वादातून कृष्णाने शुभदावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर मोठी जखम झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्त स्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी पैशांची देवाण घेवाण झाली होती. यातूनच ही घटना घडली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर