मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तोडगा काढण्यासाठी आलेले साधूच भिडले; नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाचा वाद विकोपाला

तोडगा काढण्यासाठी आलेले साधूच भिडले; नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाचा वाद विकोपाला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 01, 2022 06:16 AM IST

हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंदा, यावरून वाद सुरू झाला आहे. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली.

नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाच्या वादावरून त्र्यंबकेश्वर ग्रामस्थ आणि किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांच्यात चांगलाच वाद रंगला.
नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाच्या वादावरून त्र्यंबकेश्वर ग्रामस्थ आणि किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांच्यात चांगलाच वाद रंगला.

नाशिक : नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाच्या वादावरून त्र्यंबकेश्वर ग्रामस्थ आणि किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांच्यात चांगलाच वाद रंगला. चर्चा करतांना अचानक वाद निर्माण झाल्याने एकाने थेट साधूंवर माईक उगारला. यातून दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली. दरम्यान, गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हनुमानाच्या जन्मस्थळाचा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला.

हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंदा, यावरून वाद सुरू झाला आहे. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशिक येथे आले आहेत. बैठक सुरू होण्याआधीच जन्मस्थळाच्या मुद्यावरून दोन्ही गटात राड्याला सुरुवात झाली. आसन व्यवस्था समसमान करण्यात आली नसल्याने काही साधूंना राग आला.

दरम्यान, हनुमान जन्मस्थळाच्या मुद्यावरून दोन्हीकडून चर्चा सुरू होती. यावेळी अंजनेरी ग्रामस्थांनी गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध केला. काही दिवांपूर्वी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनही केले होते. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गाविंदानंद सरस्वती यांना नोटीस बजावली होती. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली होती.

काय आहे हनुमान जन्मस्थळाचा वाद ?

कर्नाटक येथील किष्किंधाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी नसून किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. या संदर्भात त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला. नाशिकच्या साधू, महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिध्द करण्याचे आव्हान दिल्यानंतर या आव्हानाचा स्विकार करत नाशिकच्या साधू, महंतासह गावकरी एकत्र झाले. स्थानिक महंत आणि अभ्यासकांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करीत पुराव्यानिशी सिद्धतेची तयारी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग