मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास १०० प्रवासी तब्बल १६ तास अडकून पडले होते. हे प्रवासी इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव विमानाला उशीर झाला. त्यानंतर इंडिगोने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माफी मागितली . फ्लाइट ६ ई १७ सकाळी ६:५५ वाजता इस्तंबूलसाठी रवाना होणार होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसरे विमान सोडण्यात येणार असल्याचे विमान कंपनीने जाहीर केले.
कंपनीने म्हटले की, 'मुंबईहून इस्तंबूलला जाणारे आमचे विमान ६ ई १७ तांत्रिक बिघाडामुळे उशिरा नेण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दुर्दैवाने ही समस्या दूर करून गंतव्यस्थानी पाठवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर आम्हाला विमान रद्द करावे लागले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान तीन वेळा विमानाला उशीर झाला. यावेळी प्रवाशांना किमान तीन वेळा विमानत चढवून उतरवण्यात आले. निघण्याची अंतिम वेळ जाहीर होण्याआधीच हा सगळा प्रकार घडला. त्याचवेळी प्रवाशांमधील काही विद्यार्थ्यांनी विमानतळावर निदर्शने करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या लोकांनी सांगितले की, एकतर विमान कंपनीने तिकीट परत करावे किंवा दुसऱ्या विमानाची व्यवस्था करावी.
विमानाला उशीर होत असल्याच्या तक्रारीही लोकांनी सोशल मीडियावर केल्या. सोनम सहगल नावाच्या युजरने एक्सवर लिहिले की, माझा भाऊ १२ तास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकला होता. इंडिगो आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अव्यावसायिक वागणुकीमुळे हे सर्व घडत आहे.
सोनमने पुढे लिहिले की, "सर्वप्रथम इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाला उशीर झाला. यानंतर त्यांना अनेकवेळा विमानात बसवण्यात आले आणि नंतर उतरवण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार कर्मचारी अतिशय उद्धट आहेत. रिशेड्यूलिंग आणि परताव्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तब्बल ४९२ प्रवासी प्रतीक्षेत असून त्यांना मूलभूत माहितीही मिळत नाही.
सचिन चिंतलवाड या युजरनेही चिंता व्यक्त केली आहे. इस्तंबूलहून वॉशिंग्टनला जाणारे कनेक्टिंग फ्लाइट पकडायचे होते, पण उशीर झाल्याने आणखी एक फ्लाईट चुकण्याची भीती त्याला वाटत होती. त्यांनी विमान कंपनीला विचारले की काय करावे. बिरेशकुमार सिंह या प्रवाशानेही अशीच तक्रार केली होती. विमान कधी उड्डाण घेईल याची कर्मचाऱ्यांना कल्पना नाही, असे त्यांनी लिहिले आहे. अतिशय निकृष्ट सेवा. तब्बल १६ तासाच्या विलंबाने विमान रवाना झाले.
संबंधित बातम्या