इस्रायल थांबेचना! बैरूतवर हल्ला करून हिजबुल्लाहच्या प्रवक्त्याचा खातमा; लेबनॉनमध्ये पळापळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  इस्रायल थांबेचना! बैरूतवर हल्ला करून हिजबुल्लाहच्या प्रवक्त्याचा खातमा; लेबनॉनमध्ये पळापळ

इस्रायल थांबेचना! बैरूतवर हल्ला करून हिजबुल्लाहच्या प्रवक्त्याचा खातमा; लेबनॉनमध्ये पळापळ

Nov 18, 2024 11:18 AM IST

Israel attacks central Beirut : इस्रायलने रविवारी मध्य बैरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रवक्त्याचा मृत्यू झाला. याशिवाय पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मध्य बैरूतवर इस्रायलचा भीषण हल्ला! हिजबुल्लाहचा प्रवक्ता ठार; लेबनॉनमध्ये प्रचंड दहशत
मध्य बैरूतवर इस्रायलचा भीषण हल्ला! हिजबुल्लाहचा प्रवक्ता ठार; लेबनॉनमध्ये प्रचंड दहशत (AFP)

Israel lebanon news in marathi : शनिवारी हिजबुल्लाने इस्रायलचे पंतप्रधान बेंनज्यामिन नेत्यान्याहू यांच्या घरावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात नेत्यान्याहू थोडक्यात बचावले होते. दरम्यान, या घटनेनंतर आता इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले तीव्र केले आहे. रविवारी लेबनॉनची राजधानी बैरूतवर इस्रायल हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रवक्ता ठार झाला आहे. तर आणखी काही नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या वृत्ताला लेबनॉनने दुजोरा दिला आहे. हिजबुल्लाहचे तळ दक्षिण बैरूतमध्ये असल्याने इस्रायलने या भागावर हवाई हल्ले केले. इस्रायलने मध्य बैरूतमध्ये हल्ले करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बैरूतच्या रास अल-नबा जिल्ह्यात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचे मध्यम समन्वय प्रमुख मोहम्मद अफीफ ठार झाले आहे. बैरूतच्या मार इलियास भागात देखील इस्रायलने हल्ला करण्यात आला. ज्यात आणखी दोघे ठार झाले तर २२ हून अधिक लोक जखमी झाले. मार इलियासचा परिसरात दाट लोकवस्ती आहे. इस्रायलच्या विमानांनी या भागात बॉम्बहल्ला केला. एएफपीच्या वृत्तानुसार, एअर स्ट्राईकनंतर सायरन वाजू लागले आणि सगळीकडे आगीचे लोट दिसू लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका इलेक्ट्रॉनिक स्टोअर आणि वाहनावर बॉम्बहल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर राहणाऱ्या लीना यांनी सांगितले की, ती दररोज कामावर जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करते. या हल्ल्यामुळे येथील गल्लीबोळात प्रचंड विध्वंस झाला आहे. त्या म्हणाल्या की, रहिवासी भागावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे देशात आता एकही जागा सुरक्षित राहिलेली नाही.

हिजबुल्लाहशी संलग्न असलेल्या सुन्नी मुस्लिमांची मशीद असलेल्या जामा इस्लामियावर हल्ला करण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे. जामा इस्लामियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या संघटनेच्या कोणत्याही इमारतीला लक्ष्य करण्यात आले नाही. दरम्यान, या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रवक्ता ठार झाल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलं आहे.

लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, बैरूतमधील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद राहतील. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात चार जण ठार तर १४ जण जखमी झाले होते. इस्रायली सैन्याने सांगितले की, दोन दिवसांत २०० ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Whats_app_banner