मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ishrat Jahan : इशरत जहाँ एन्काउंटरवरील पुस्तक प्रकाशन सोहळा पुणे पोलिसांनी रोखला
Ishrat Jahan
Ishrat Jahan

Ishrat Jahan : इशरत जहाँ एन्काउंटरवरील पुस्तक प्रकाशन सोहळा पुणे पोलिसांनी रोखला

25 January 2023, 12:58 ISTNinad Vijayrao Deshmukh

Ishrat Jahan Encounter book publication : पुण्यात इशरत जहाँ चकमकीवर आधारित होणारा पुस्तक प्रकाशन सोहळा पुणे पोलिसांनी रोखला. पोलिसांनी नोंदवलेल्या आक्षेपामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ संयोजकांवर आली आहे.

पुणे : इशरत जहाँ चकमकीवर लिहिलेल्या पुस्तक ऊर्दूतून असल्याचे कारण देत त्यावर आक्षेप नोंदवत हा कार्यक्रम पुणे पोलिसांनी रोखला. यामुळे संयोजकांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. तसेच पुस्तक प्रकाशनाच्या वेळी चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता, अशी माहिती मूलनिवासी मुस्लीम मंचचे अध्यक्ष अंजूम इनामदार तसेच समाजवादी मंचचे अनिस अहमद यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

गुजरातमधील दंगलीत इशरत जहाँचे पोलिसांनी बनावट एन्काउंटर केले असल्याचा आरोप आहे. यावर ‘इशरत जहाँ एन्काऊंटर‘असे पुस्तक लिहिण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन हे मुंबईतील अब्दुल वाहिद शेख यांनी मुंबईतच इशरत जहाँ यांची आई शमिमा कौसर यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. पुण्यात देखील या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार होता. मात्र, पुणे पोलिसांनी यावर आक्षेप नोंदवला. हा कार्यक्रम मंगळवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्मारकात होणार होता. या सोहळ्याची तयारी देखील संयोजकांनी केली होती. सभागृहाचे पैसे भरुन त्याचे भाडे देखील देण्यात आले होते.

दरम्यान, पुस्तक प्रकाशनावेळी काही गोंधळ होऊ नये या साठी खडक पोलिस ठाण्यालाही माहिती देण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, पुणे पोलिसांच्या आक्षेपामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयोजकांना फोन करत हा कार्यकम घेता येणार नाही असे सांगितले. तुमचे पैसे परत घेऊन जावे, असे देखील सांगण्यात आल्याने संयोजक आक्रमक झाले होते. या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने सावित्रीबाई फुले स्मारकावर मंगळवारी दुपारपासून पोलिसांचा बंदोबस्त होता.

मुंबईत या पुस्तकाचे प्रकाश झाले तेथे त्यावर कसलीही बंदी नाही. मग पुण्यात कुणाच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असा प्रश्न संयोजकांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल म्हणाले, हे पुस्तक उर्दूत आहे, त्याची माहिती करून घेऊ, असे सांगितले. त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या विषयावर करण्यात येणारे आंदोलन तूर्त स्थगित करत आहोत. मात्र, पोलिसांबरोबर पुन्हा चर्चा केली जाणार असल्याचे अंजूम इनामदार व अनिस अहमद यांनी सांगितले.

 

विभाग