आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी!

आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी!

Nov 05, 2024 02:21 PM IST

ips sanjay varma new dig of Maharashtra : राज्याच्या पोलिस महासंचलिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली झाल्यावर राज्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची निवड करण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी!
आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी!

ips sanjay varma new dig of maharashtra : राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर राज्याचे महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची निवड करण्यात आली आहे. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं होतं. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

राज्यात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी आघाडीवर होती. अखेर संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली. संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे ते डी.जी. पी राहिले आहेत.

राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर तब्बल २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील १५ अधिकारी हे मुबंईतील होते. पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. पण राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, डीजीपी, पोलीस महासंचालक यांची बदली करण्यात आली नव्हती. त्यामुळे २० नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची मागणीरश्मी शुक्ला काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी आयोगाला पत्र देखील पाठवले होते. रश्मी शुक्ला जोपर्यंत या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणूक होणे अवघड असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. अखेर निवडणूक आयोगाने या मागणीची दखल घेत डिजीपी रश्मी शुल्का यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते.

Whats_app_banner