मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IPS Officer Transfer: राज्यातील तब्बल ३२ IPS ‌अधिकाऱ्यांच्या‌ बदल्या; पुण्याच्या आयुक्तपदी अमितेश कुमार

IPS Officer Transfer: राज्यातील तब्बल ३२ IPS ‌अधिकाऱ्यांच्या‌ बदल्या; पुण्याच्या आयुक्तपदी अमितेश कुमार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 31, 2024 08:58 PM IST

IPS Transfers : राज्यातील ३२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS Officer Transfer
IPS Officer Transfer

Maharashtra Police Officer Transfers :  राज्यात प्रशासनाने मोठे फेरबदल केले असून राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणारे अमितेश कुमार हे आता पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. तर आयपीएस अधिकारी रविंद्र सिंघल यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तवपदी नियक्ती करण्यात आली आहे. 

गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी पदोन्नती देण्यात आली आहे.   अजयकुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत. यापूर्वी अजय कुमार बन्सल मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त होते. पुणे पोलीस आयुक्त असणारे रितेश कुमार यांना पदोन्नती देत होमगार्डचे महासमादेशक पदी मुंबईत नियुक्ती देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीआधी पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत.  राज्यातील  ५० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

एम. सुदर्शन असतील नवे पोलिस अधीक्षक, विद्यमान अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची परभणी येथे बदली, सुदर्शन नागपूर येथे पोलीस उपायुक्त -गुन्हे या पदावर होते कार्यरत, शासनाने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या केलेल्या मोठ्या बदली आदेशात यांची नावे आहेत. 

WhatsApp channel