Pune online task fraud : हॉटेल आणि उपहारगृहाला रिव्ह्यू, रेटिंग देण्याची नोकरी असल्याच्या बहाण्याने वेगवेगळे ऑनलाइन टास्क देऊन कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांनी केला. या प्रकरणी तब्बल १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी ९५ बनावट बॅंक खात्यांमधून २०० कोटींचे व्यवहार करत फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील फसवणूक झालेल्या नागरिकांची तब्बल साडेतीन कोटींची फसवूक करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींची खाती गोठवली आहे.
चिंतन शशिकांत फडके (वय ३५, रा. मध्यप्रदेश), ब्रजराज रामरतन वैष्णव (वय १८, रा. राजस्थान), सुंदरदास चेदनदास सिंधी (वय २४, रा. राजस्थान), राजेश भगवानदार करमानी (वय २६, रा. राजस्थान), मोहम्मद रशिद चांद मोहम्मद (वय ४७, रा. राजस्थान), अभिषेक सत्यनारायण पाराशर (वय २४, रा. राजस्थान), आशिष प्रल्हादराय जाजू (वय ३५, रा. कोंढवा), मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद (वय २४, रा. अजमेर), नवीनकुमार नेवंदराम आसनाणी ( वय ४० रा. राजस्थान ), विकास सत्यनारायण पारिख (वय २९, रा. राजस्थान), सुरेश गोवर्धनदास सिंधी (वय ३२, रा. राजस्थान), गौरव महाविर सेन (वय ३१, रा. राजस्थान), ललित नवरतन मल पारिख (वय ३३, रा. राजस्थान), मनिष ऋषिकेश वैष्णव (वय ३३, रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून केवळ गुन्हे उघडकीस आणेल नसून प्रथमच ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील आरोपींना जेरबंद केले आहे. या टोळीने देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिस ठाण्यात एका महिलेने ऑनलाईन टास्क फ्रॉडद्वारे तिची ७१ लाख ८२ हजार ५२० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती. हा गुन्हा गंभिर आणि तांत्रिक स्वरुपाचा असल्याने या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ४ कडे देण्यात आला होता. युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर आवताडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक अंबरिष देशमुख, पोलिस उपनिरिक्षक गणेश रायकर यांनी तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याचा तपास सुरु केला. यामध्ये आरोपींनी ऑनलाईन फ्रॉडसाठी वेगळीच पद्धत वापरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या गुन्ह्याचा खोलात जाऊन तपास करत तसेच आरोपींची गुन्ह्याची पद्धत समाजावून घेत पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली. त्यानुसार मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये जाऊन १४ आरोपींना जेपबंद केले. या कारवाईनंतर ऑनालाईन टास्क फ्रॉडचे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच हे गुन्हे करण्यासाठी आरोपींनी ९५ बनावट बॅंक खाते उघल्याचेही समोर आले आहे. हिंजवडी, वाकड, चिंचवड पिंपरी, आळंदी, चिखली, अवधुतवाडी, पुर्व विभाग सायबर पोलिस, दक्षिण विभाग सायबर पोलिस, सायबर क्राईम पोलिस ठाणे, सेंट्रल सायबर पोलिस ठाणे बेंगलोर, सायबर क्राईम पोलिस ठाणे आगरा, सायबर क्राईम पोलिस ठाणे हावडा या पोलिस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत.
संबंधित बातम्या