Alibaug Crime : अलिबागमध्ये जुगार सुरू असलेल्या संशयातून पोलिसांनी एका रिसॉर्टवर छापा टाकला. मात्र, या कारवाईत धक्कादाक घटना उघडकीस आली. या ठिकाणी एका बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतल्या नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटण्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. ही कॉल सेंटर कोण चालवत होतं याची माहिती पोलिस घेत आहेत.
अलिबाग तालुक्यामधील परहूर येथील नेचर्स एज या रिसॉर्टवर पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला. येथे ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, मात्र, या ठिकाणी अमेरिकेतल्या पर्यटकांना गंडा घालण्याचे काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरू होते. रात्री १० वाजता ही धाड टाकण्यात आली. यावेळी या ठिकाणी ५० पेक्षा जास्त तरुण फोनवरून कॉल करत असतांना दिसले. या ठिकाणी विविध यांत्रिक साहित्य देखील पोलिसांना दिसले. येथे असणाऱ्यांची चौकशी केली असता या ठिकाणी अमेरिकेतून पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना सेक्ससाठी गोळ्या औषधे व काही उपकरणे पुरविणे या सारखे आमिष दाखवून त्यांची आंतरराष्ट्रीय कॉलिंग द्वारे फसवणूक केली जात होती.
हे रिसॉर्ट रात्री उशिरा पर्यन्त सुरू राहत होते. यामुळे या ठिकाणी गैरकारभार सुरू असल्याचा संशय पोलिसांना आला. यामुळे त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे.
अलिबाग मधील नेचर्स एज या रिसॉर्टमध्ये तब्बल मधील एकूण १२ खोल्यांमध्ये ही टोळी हे कॉल सेंटर चालवत होते. येथील वेटरला देखील आरोपी मोठी टीप देत असल्याने त्यांनी देखील ही प्रकरण लपून ठेवले. अटक करण्यात आलेले सर्व आरोपीने बाहेरच्या राज्यातील आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.