Pune moshi murder : पुण्यात सैराट चित्रपटाप्रमाणे एकाच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बहिणीने आंतरधर्मीय लग्न केल्याने संतापलेल्या भावाने बहिणीच्या पतीची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोशी जवळील जंगलात घडली. या हत्येमागे बहिणीचा भाऊ आणि दुसऱ्या बहिणीचा नवरा असल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे.
अमीर मोहम्मद शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. तर अमीरच्या पत्नीचा भाऊ सुशांत गोपाळ गायकवाड, मेहुणा गणेश गायकवाड व पंकज विश्वनाथ पाईकराव असे आरोपींची नावे आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर मोहम्मद शेख व निकिताचे प्रेमसंबंध होते. हे दोघेही एकाच गावी राहत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याची कुणकुण घरच्यांना लागली होती. त्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. मात्र, कुटुंबाचा विरोध झुगारून दोघांनी आंतरधर्मीय लग्न केले. गावात राहिल्यास काही तरी बरे वाईट होण्याची शक्यता लक्षात घेता दोघेही पुण्यातील मोशी येथे राहण्यासाठी आले होते. दोघांचा संसार चांगला सुरू असतांना निकिता उर्फ अरीना हिच्या भावाने अमीर सोबत जवळीक वाढवली व लग्न मान्य असल्याचं भावसलं. १५ जून रोजी अमीर शेख हा कंपनीत जाण्यासाठी भेर पडला. यावेळी निकीताच्या दुसऱ्या बहिणीचा पती साडु पंकज पाईकरावने अमीरला दारू पिण्यासाठी भोसरीतील एका हॉटेल मध्ये बोलावलं. त्या ठिकाणी गणेश गायकवाड देखील होता. तिघांनी दारू प्यायल्यावर अमीरला आणखी दारू पिण्याचा आग्रह सुशांत आणि गणेश गायकवाडने केला. त्यांनी हॉटेलमधून दारूची बॉटल घेत सर्व जण आळंदी- चाकण रस्त्याच्या परिसरातील जंगलात गेले.
या ठिकाणी त्यांनी पुन्हा दारू प्यायली. अमीर हा नशेत असतांना सुशांत ने पंकजला फोन करून लांब जाण्यास सांगितले. सुशांत व गणेशने यानंतर अमीरला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्यांनी अमीरच्या मृतदेहावर डिझेल टाकून मृतदेह पेटवून दिला. तसेच त्याची हाडे व राख हे गोणीत भरून नदीत फेकून दिली.
दरम्यान, अमीर घरी आला नअसल्याने पत्नी निकिता उर्फ अरीनाने या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. तर अमीर सोबत घात पात झाल्याचा संशय अमीरचे वडील मोहम्मद शेख यांनी व्यक्त केला. पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी पंकज व सुशांतला लोणावळा परिसरातून अटक केली. गणेश गायकवाड हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
संबंधित बातम्या