मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  INS Vikramaditya: विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आग; चौकशीचे आदेश

INS Vikramaditya: विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आग; चौकशीचे आदेश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jul 21, 2022 11:12 AM IST

Fire on INS Vikramaditya भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका असलेली आयएनएस विक्रमादित्यवर काल आग लागली. जहाजावरील जवानांनी लवकरच ही आग नियंत्रणात आणली. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याबाबत चौकशी करण्याचे आदेश नौदलाने दिले आहे.

INS Vikramaditya
INS Vikramaditya

INS Vikramaditya Aircraft carrier   भारताची एकमेव विमानवाहू लढाऊ जहाज असलेली आयएनएस विक्रमादित्यवर बुधवारी संध्याकाळी अचानक आग लागली. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. जहाजावरील जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. या पूर्वीही नौदलाच्या पाणबुड्या आणि जहाजांवर आग लागण्याच्या घटना घडल्या आहे. सुदैवाने या अपघात कोणी जखमी अथवा मृत्यूमुखी पडले नाही. दरम्यान, या घटनेप्रकरणी नौदलाने कोर्ट आॅफ इन्कॉयरीचे आदेश दिले आहे.

भारताने रशियाकडून ही युद्धनौका विकत घेतली आहे. सध्या ही विमानवाहू नौका कर्नाटक राज्यातील कारवार या बंदरावर तैनात आहे. सायंकाळी जहाजवर अचानक आग लागली. जहाजावरील कर्मचा-यांनी अग्निशमक यंत्राचा वापर करत काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.

हिंदमहासागरात दुरवर मोहिमा राबविण्यासाठी आएएनएस विक्रमादित्य महात्वाची भूमिका बजावते. विमानवाहू युद्धनौका असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताकडे आतापर्यंत आयएनएस विक्रांत, आएएनएन विराट आणि आएएनएस विक्रमादित्य या तीन विमानवाहू युद्ध नौका होत्या. यातील आयएनएस विक्रांत आणि आएएनएस विराट या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्या आहेत. भारत स्वदेशी बनावटीच्या आयएनएन विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी करत असून तीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. १५ आॅगस्टला ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे. त्यामुळे आएएनएस विक्रमादित्य नंतर आयएनएस विक्रांत या दोन युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे.

आयएनएन विक्रमादित्य ही सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. रशियन बनावटीची ही युद्धनौका किव-श्रेणीतील आहे. तीची लांबी २८३.५ मीटर आहे. २०१३ मध्ये ती भारतीय नौदलात दाखल करण्यात आली होती.

WhatsApp channel