INS ब्रह्मपुत्रा युद्धनौकेचा अपघात, एका बाजुला झुकली अन् नंतर लागली आग; १ नौसैनिक बेपत्ता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  INS ब्रह्मपुत्रा युद्धनौकेचा अपघात, एका बाजुला झुकली अन् नंतर लागली आग; १ नौसैनिक बेपत्ता

INS ब्रह्मपुत्रा युद्धनौकेचा अपघात, एका बाजुला झुकली अन् नंतर लागली आग; १ नौसैनिक बेपत्ता

Published Jul 22, 2024 10:22 PM IST

INS Brahmaputra : आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेचा समुद्रात अपघात झाला असून रविवारी या युद्धनौकेला आग लागल्यानंतर जहाज एका बाजुला झुकले. आगीच्या घटनेनंतर एक खलाशी बेपत्ता असल्याचे समजते.

आयएनएस ब्रह्मपुत्रा(File photo)
आयएनएस ब्रह्मपुत्रा(File photo)

मुंबईत नेव्हल डॉकयार्डमध्ये दुरुस्ती दरम्यान भारतीय नौदलाची युद्धनौका INS ब्रह्मपुत्रामध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी युद्धनौका एका बाजुला झुकली आहे. भीषण अग्निकांडात जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत एक नाविकही बेपत्ता झाला आहे. नौदलाने म्हटले की, आगीवर नियंत्रण मिळवले आहे. हा अपघात तेव्हा झाला ज्यावेळी युद्धनौका दुरुस्तीसाठी नेली जात होती. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाला भीषण आग लागल्यानंतर जहाज एका बाजुला झुकले आहे. आगीच्या घटनेनंतर बेपत्ता असलेल्या खलाशाचा अधिकारी शोध घेत आहेत. आयएनएस ब्रह्मपुत्रेला २१ जुलै रोजी आग लागली होती. मुंबईच्या नौदलाच्या डॉकयार्डच्या अग्निशामक दलाच्या मदतीने जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. पण बंदराच्या बाजूला झुकली गेली. 

प्रयत्न करूनही जहाजाला सरळ स्थितीत आणता आले नाही, असे नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे. भारतीय नौदलाच्या ब्रह्मपुत्रा या बहुउद्देशीय युद्धनौकेला २१ जुलै रोजी संध्याकाळी आग लागली होती. २२ जुलै सकाळपर्यंत नौदल डॉकयार्ड, मुंबई आणि बंदरातील इतर जहाजांच्या अग्निशामक दलाच्या मदतीने जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. तसेच, आगीच्या उर्वरित धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी सॅनिटायझेशन तपासणीसह पाठपुरावा करण्यात आला, असे नौदलाने निवेदनात म्हटले आहे.

"आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेला लागलेल्या आगीच्या घटनेत युद्धनौकेला एका बाजूला झुकले आहे. सर्व प्रयत्न करूनही जहाज सरळ स्थितीत आणता आले नाही.  नौदलाने सांगितले की, एक कनिष्ठ खलाशी वगळता सर्व कर्मचारी सुखरुप आहेत.  एका खलाशाचा शोध घेण्यात येत असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश नौदलाकडून देण्यात आले आहेत.

आयएनएस ब्रह्मपुत्रा स्वदेशी बनावटीची 'ब्रह्मपुत्र' श्रेणीची पहिले मिसाइल फ्रिगेट आहे. ही युद्धनौका २००० मध्ये भारतीय नौदलात सामील झाली होती. या जहाजावर ४० अधिकारी व ३३० खलाशी दल आहे. आयएनएस ब्रहमपुत्रा मध्यम आणि जवळच्या अंतर तसेच विमानभेदी तोफांनी सुसज्जित आहे. त्याचबरोबर जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि टारपीडो लाँचर लावले आहेत. हे सीकिंग आणि चेतक हेलिकॉप्टर वाहून नेण्यास सक्षम आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर