Mumbai Accident: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी; अपघाताची मालिका सुरूच-innova car overturned at eastern express highway near vikhroli mumbai accident news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी; अपघाताची मालिका सुरूच

Mumbai Accident: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी; अपघाताची मालिका सुरूच

Sep 15, 2024 12:25 PM IST

Mumbai eastern express highway accident : मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरवर आज पुन्हा अपघात झाला आहे. भरधाव वेगातील एक कार महामार्गावर पलटी झाली आहे. यात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी
मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी

Mumbai eastern express highway accident : मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर अपघाताची मालिका सुरूच आहे. भरधाव वेगातील एक कार महामार्गावर पलटी झाल्याने भीषण आपघर झाला असून या घटनेत ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हा अपघात विक्रोळी जवळ झाला. जखमी नागरिकांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले आहे. त्यांचावर उपहार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी विक्रोळी येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात झाला. या मार्गावरून आज सकाळच्या सुमारास एक ईनोव्हा गाडी काही नागरिकांना घेऊन जात होती. यावेळी या कारचा वेग खूप जास्त होता. अचानक चलकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे गाडी ही पलटी झाली व दूर पर्यंत घासत गेली. यानंतर ही गाडी महामार्गावरील डीव्हायडरला जाऊन धडकली. या घटनेत कारचा चक्काचूर झाला. घटनास्थळाचे दृश्य भयावह होते. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक मदत कार्यासाठी धावत गेले. त्यांनी गाडीतील जखमी नागरिकांना बाहेर काढले. तसेच त्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात सर्व जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चितांजनक असल्याची माहिती आहे. गाडीच्या भरधाव वेगामुळे हा अपघात झाला असावा अशी माहिती आहे. या घटनेनंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

अपघात झाल्यावर पोलिसांनी देखील घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. त्यांनी जखमी नागरिकांची चौकशी केली आहे. अपघातग्रस्त गाडी बाजूला घेण्यात आली आहे. तसेच येथील वाहतूक ही पूर्ववत करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात देखील झाला होता अपघात 

मुंबईतील विक्रोळी येथे ईस्टर्न एक्सप्रेवर गेल्या महिन्यात २३ तारखेला अपघात झाला हतो.  दोन मित्र कारने जात  असतांना त्यांच्या  गाडीचा वेग जास्त असल्याने व गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार  झाडावर जाऊन आदळून हा अपघात झाला होता.  या घटनेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला होता.   रोहित भाऊसाहेब निकम व सिद्धार्थ राजेश ढगे हे दोन मित्र या अपघातात मृत्यूमुखी पडले होते.  या मार्गावरील वेग अपघातास कारणीभूत ठरत आहेत. 

Whats_app_banner
विभाग