मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baramati News : बारामतीमधील काऱ्हाटीत अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक

Baramati News : बारामतीमधील काऱ्हाटीत अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 12, 2024 12:13 PM IST

ink thrown on ajit pawar sunetra pawar banner in baramati : बारामती येथील काऱ्हाटीत येथे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत हा फलक काढून टाकला आहे.

ink thrown on ajit pawar sunetra pawar banner in baramati
ink thrown on ajit pawar sunetra pawar banner in baramati

ink thrown on ajit pawar sunetra pawar banner in baramati : राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यावर अजित पवार आणि शरद पवार गट वेगळे झाले आहे. त्यात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ही अजित पवार गटाला दिल्यामुळे दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, बारामती तालुक्यतून खासदारकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. या बाबत बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे एकाने त्याच्या शेतात फलक लावला होता. या फलकावर रात्री अंधाराचा फायदा घेत शाईफेक करण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी येथ हा फलक काढून टाकण्यात आला आहे. तर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Farmers Protest Delhi: शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चामुळं मोदी सरकार टेन्शनमध्ये, दिल्लीच्या सीमा सील, काटेरी कुंपणं

बारामती मतदार संघातून खासदारकी साठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार हे येथील नागरिकांना त्यांनी दिलेल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करतांना दिसत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करावं, अशा आशयाचा आणि अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेला फलक काऱ्हाटी गावात एका शेती फार्ममध्ये लावण्यात आला होता.

LTT Mega Block: लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ७ दिवसांचा मेगाब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

दरम्यान, सध्या बारामतीत शरद पवार आणि अजित पवार गटात संघर्ष पेटलेला दिसत आहे. या फलकावर शनिवारी रात्री, शाईफेक करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या सोबतच येथील राजकीय वर्तुळात देखील या घटनेमुळे चर्चा सुरू आहे. या फलकावर सुनेत्रा पवार यांना खासदार करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहक करण्यात आले होते. यावर सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. यावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांचाही फोटो होता. या बोर्डवर शाई फेक करण्यात आल्यामुळे पोलिसांनी याची दाखल घेत हा फलक काढून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीतील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक पदाढीकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. आत पक्ष आणि पक्ष चिन्ह देखील शरद पवार यांच्याकडून काढून घेऊन ते अजित पवार गटाला देण्यात आले आहे. शरद पवार सुप्रिया सुळे हे दोघे केंद्राची जबाबदारी सांभाळत असतांना अजित पवार यांनी पक्षांवरील पकड मजबूत केली. यामुळे राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि खासदार हे अजित पवारांचे निष्ठावंत असून यामुळे त्यांच्या मागे राष्ट्रवादी कॉँग्रेसची मोठी टीम सोबत असल्याचे पाहायला मिळत आहे.

WhatsApp channel