Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संवेदनशील माहिती सोशल मीडियात व्हायरल-information of women beneficiaries in ladki bahin scheme spread on social media in palghar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संवेदनशील माहिती सोशल मीडियात व्हायरल

Ladki Bahin yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संवेदनशील माहिती सोशल मीडियात व्हायरल

Aug 20, 2024 11:08 AM IST

Ladki Bahin yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा केले आहे. मात्र, पालघरमध्ये अनेक लाभार्थी महिलांची संवेनशील माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संवेदनशील माहिती सोशल मिडियावर झाली व्हायरल
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संवेदनशील माहिती सोशल मिडियावर झाली व्हायरल

Ladki Bahin yojana : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केला आहे. या साठी त्यांनी बँकेत मोबाईल क्रमांक, पत्ता, बँक खाती आदी खासगी माहिती बँकेत दिली आहे. मात्र, पालघरमध्ये तब्बल ११ हजार १७२ महिलांची ही संवेनशील सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. भविष्यात या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. यामुळे महिलांमध्ये रोषाचे वातावरण आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या माहितीत मोबाइल आणि आधार क्रमांक नसल्याचा दावा करण्यात आला असला तर उर्वरित राज्यात देखील हा प्रकार घडला असल्याची शक्यता असल्याने सायबर गुन्हेगार याचा फायदा घेण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहिर केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. योजनेच्या सुरवातीला लाभार्थी महिलांच्या खात्यात २ महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या साठी महिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेची माहिती यासह इतर खासगी माहिती देखील भरून घेण्यात आली. मात्र, पालघरमध्ये अनेक महिलांची ही खासगी माहिती सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली आहे. तब्बल ११ हजार १७२ महिलांची माहिती ही व्हायरल झाली आहे. ही माहिती कशी लिक झाली. तसेच या साठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. व्हायरल झालेल्या यादीमध्ये आधार व बँक खातेक्रमांक नसल्याकहा दावा करण्यात आला असला तरी या माहितीच्या आधारे सायबर चोरटे मोठा फ्रॉड करण्याची शक्यता आहे.

सायबर फसवणुकीची शक्यता

या योजनेची माहिती ही अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक तसेच इतर अधिकाऱ्यांपर्यंत भरून घेण्यात आली होती. ही माहिती शासणापर्यन्त येतांना चुकीने व्हायरल झाली असा अजब दावा पालघर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार यांनी केला आहे. मात्र, ही माहिती व्हायरल होणे चुकीचे असल्याचं सायबर तज्ञांच म्हणणं आहे. याबर गुन्हेगार या संवेदनशील माहितीचा वापर करून महिलांची फसवणुक करण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना मोबाइलवर फोन, मेसेज करून त्रास दिला जाऊ शकतो. तर त्यांची खाती देखील हॅक केले जाऊ शकतात.