मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  इंटरनेटवर सहज माहिती मिळत असल्याने गुन्हेगारीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मत

इंटरनेटवर सहज माहिती मिळत असल्याने गुन्हेगारीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मत

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 20, 2022 01:54 PM IST

श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मत व्यक्त करताना वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली.

इंटरनेटवर सहज माहिती मिळत असल्याने गुन्हेगारीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मत
इंटरनेटवर सहज माहिती मिळत असल्याने गुन्हेगारीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मत (HT_PRINT)

श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मत व्यक्त करताना वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबतही चिंता व्यक्त केली. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा उल्लेख केला. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी म्हटलं की, इंटरनेटवर कोणतीही माहिती सहज उपलब्ध झाल्याने गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. श्रद्धा हत्याकांड हे प्रकरण याचचं उदाहरण आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता आहे.

नव्या काळात नवी उपकरणे शोधली जात आहेत. आमच्याकडे १९८९ मध्ये फोन नव्हते, त्यानंतर पेजर आले. मोटोरोलाचे मोठे हँडसेट होते. ते आता अगदी लहान फोनपर्यंत आलंय. त्यात कल्पना करता येणार नाही अशा गोष्टींचा समावेश त्यात आहेत. तसंच ते कुणीही हॅक करू शकतात त्यामुळे आमच्या गोपनीयतेवरही आक्रमण आहे असं न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले.

न्यायमूर्ती दत्ता यांनी म्हटलं की, दिल्लीत एक मुख्य खंडपीठ असण्याऐवजी इतर सहा ठिकाणी बसण्याची परवानगी आहे का हे बघायला हवं. राष्ट्रीय हरित न्यायधिकरण कायद्यानुसार प्रादेशिक खंडपीठे आहेत आणि संपूर्ण भारतात पाच एनजीटी खंडपीठे आहेत.

देशाची राज्यघटना अतिशय काळजीपूर्वक अशी तयार केलीय. देशाचा सर्वोच्च कायदा तयार केला होता. आपली राज्यघटना मोडीत काढू नये. सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही मजबूत कायद्याची गरज आहे. सध्याच्या मुंबईत प्रेम आणि दिल्लीत खून या विकृतीला इंटरनेट जबाबदार आहे. इटंरनेटवर गुन्ह्याबाबतची माहिती सहज उपलब्ध झाल्याने अशा घटनामध्ये वाढ होत असल्याचंही न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी सांगितलं.

WhatsApp channel